12 December 2019

News Flash

‘बदन पे सितारे’ गाण्यावर रणवीर व सुनील गावस्कर यांचा डान्स पाहिलात का?

Ind vs Pak सामन्यादरम्यान बॅकस्टेजवर रणवीर सिंग व सुनील गावस्कर यांची धमाल मस्ती

हरभजन सिंगने शेअर केला व्हिडिओ

विश्वचषकातील रविवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी हरवल्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा झाला. रविवारी सकाळपासूनच सामन्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा मागे नव्हते. अभिनेता रणवीर सिंग मँचेस्टरच्या मैदानावर अनोख्या अंदाजात झळकला. आता रणवीर सिंग जिथे असेल तिथे उत्साह, ऊर्जेचं वातावरण आवर्जून पाहायला मिळतं. असंच काहीसं दृश्य सामन्यादरम्यान बॅकस्टेजवर पाहायला मिळालं. सुनील गावस्कर यांच्यासोबत रणवीर बॅकस्टेजवर थिरकत होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘बदन पे सितारे लपेटे हुए’ या गाण्यावर रणवीरसोबत सुनील गावस्कर यांनी ठेका धरला. विशेष म्हणजे हा व्हिडिओ क्रिकेटर हरभजन सिंगने शूट केला आणि युट्यूबवर त्याने अपलोड केला. रणवीरच्या उपस्थितीमुळे उत्साह द्विगुणीत झाला होता. क्रिकेट व बॉलिवूड हे परफेक्ट समीकरण यावेळी चाहत्यांना पाहायला मिळालं.

रणवीरचा आगामी चित्रपटसुद्धा क्रिकेटशी निगडीत आहे. ’83’ या चित्रपटात तो कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या विजयगाथेवर हा चित्रपट आहे. ‘83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

First Published on June 17, 2019 1:15 pm

Web Title: ranveer singh and sunil gavaskar groove to badan pe sitaare lapete hue at backstage during the india vs pakistan match ssv 92
Just Now!
X