News Flash

रणवीर सिंग जगात भारी! सेलिना गोमेजला पछाडत ठरला सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी

रणवीर सिंगने लोकप्रियतेच्या बाबतीत हॉलिवूड कलाकारांनाही पछाडले

रणवीर सिंग बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंकडिन यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो सुपरहिट आहे. मात्र आता Giphy या नव्या प्लॅटफॉर्मवर देखील त्याने इतर सेलिब्रिटींना पछाडले आहे. Giphy वर एक कोटी व्हूज मिळवणारा तो जगातील पहिला सेलिब्रिटी ठरला आहे.

अवश्य पाहा – “पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा

 

Giphy एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इन्स्टाग्राम प्रमाणेच यावर देखील व्हिडीओ, फोटो वगैरे पोस्ट केले जातात. या प्लॅटफॉर्मवर रणवीरने पॉपस्टार सेलिना गोमेजला पछाडत सर्वाधिक व्हूज मिळवले आहेत. सध्या त्याने जगभरातून तब्बल एक कोटी व्हूज मिळवले आहेत. तर सेलिना गोमेजला ९० लाख ६१ हजार व्हूज मिळाले आहेत. सर पॉल मॅक्कार्टनी, मडोना, टेलर स्विफ्ट, एरियाना ग्रँड यांसारखे अनेक नामांकित सेलिब्रिटी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 6:15 pm

Web Title: ranveer singh beats selena gomez to record over 1 billion views mppg 94
Next Stories
1 लॉकडाउनच्या काळातही आऊटडोअर सिन्सची मेजवानी!
2 करोनाच्या भीतीने अभिनेत्याने सोडली मुंबई, सध्या राहतोय फार्महाउसवर
3 शाहरुखला पाहून रडू लागला चाहता, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X