17 January 2021

News Flash

‘रामलीला’चा सेट अन् दीप-वीरची केमिस्ट्री; अशी सुरू झाली लव्हस्टोरी

चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल दीप-वीरची लव्हस्टोरी

बॉलिवूडमध्ये आपल्या अतरंगी स्टाइलमुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. उत्तम अभिनय शैली आणि खेळकर स्वभाव यामुळे रणवीरने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आज तो अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत असून काही जणींचं क्रश सुद्धा आहे. परंतु, लाखो तरुणींच्या हृदयाची धडधड असणारा हा अभिनेता मात्र दीपिका पदुकोणच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं. २०१८ मध्ये लग्नगाठ बांधलेली ही जोडी कायम त्यांच्यातील प्रेमामुळे आणि नात्यातील गोडव्यामुळे चर्चेत येत असते. त्यामुळे आज कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे लोकांच्या पसंतीत उतरलेल्या या जोडीची लव्हस्टोरी फार कमी जणांना माहित असेल. परंतु त्यांची लव्हस्टोरी कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.

दीपिका-रणवीरचा ‘रामलीला’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात ऑनस्क्रीन एकत्र आलेली ही जोडी कधी ऑफस्क्रीन एकत्र आली हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. संजय लीला भन्साळी यांच्या याच रामलीला चित्रपटापासून दीप-वीरची लव्हस्टोरी खऱ्या अर्थाने सुरु झाली. विशेष म्हणजे हा चित्रपट करत असतानाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले या वृत्ताला सेटवरील एका व्यक्तीने दुजोराही दिला.

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात दीपिका आणि रणवीर हे दोघंही मुख्य भूमिकेत झळकल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे एकीकडे चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं, तर दुसरीकडे या दोघांच्या प्रेमाला अंकुर फुटत होता. या चित्रपटातील ‘अंग लगा दे रे’ या गाण्याच्या चित्रीकरणावेळी हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं साऱ्यांच्या लक्षात आलं. गाण्याचं चित्रीकरण सुरु असताना यात एक किसिंग सीन होता.हा सीन पूर्ण झाल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी कट असं म्हटलं, मात्र तरीदेखील या दोघांचं लक्ष नव्हतं. कट म्हटल्यानंतरही ते एकमेकांना किस करत होते, याच सीनवरुन ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचं उपस्थितांच्या लक्षात आलं.

दरम्यान, ‘रामलीला’ या चित्रपटापासून खऱ्या अर्थाने दीप-वीरची लव्हस्टोरी सुरु झाली. या चित्रपटानंतर दोघांनीही ‘बाजीराव-मस्तानी’, ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र काम केलं. विशेष म्हणजे लग्नानंतर पुन्हा एकदा ही जोडी ’83’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचं दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 10:06 am

Web Title: ranveer singh birthday special deepika padukone and ranveer singh love story ssj 93
Next Stories
1 सलमानने बिग बॉस १४साठी वाढवली फी, घेणार इतके कोटी?
2 ‘…आता परीक्षा देवाची’; प्रवीण तरडेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा
3 ट्रायच्या अ‍ॅपमुळे वाहिन्यांची निवड सोपी
Just Now!
X