19 August 2018

News Flash

…अन् चक्क रणवीर सिंगने मुलीचे जॅकेट घातले

आपण ट्रोल होऊ की काय असा प्रश्न कलाकारांना नेहमी पडतो

रणवीर सिंग आणि दिया मिर्झा

रणवीर सिंग त्याच्या अभिनयासाठी जेवढा ओळखला जातो, तेवढाच तो अतरंगी फॅशनसाठीही ओळखला जातो. तो कधी कोणत्या विचित्र कपड्यांमध्ये दिसेल काही सांगता येत नाही. ‘राम-लीला’, ‘बाजीराव- मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या सिनेमांमध्ये अफलातून अभिनय केल्यानंतर त्याच्या अभिनयाचे भरभरून कौतुक करण्यात आले. तो कॅमेऱ्या समोर जेवढा अतरंगी वाटतो तेवढाच तो कॅमेऱ्या मागेही अतरंगी आहे. पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनेकांचे लक्ष कलाकारांच्या स्टाइल स्टेटमेंटवर असते. पण नेहमीच काही तरी वेगळं करून दाखवतो. सहसा आगळा वेगळा पेहराव करायला कलाकार घाबरतात. आपण ट्रोल होऊ की काय असा प्रश्न त्यांना नेहमी पडतो. पण अशा टीकांना घाबरेल तो रणवीर कसला. प्रत्येकवेळा काही तरी वेगळं करण्यालाच प्राधान्य देतो.

💀🔱 #khilji #padmaavat

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

आता हेच पाहा ना… नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यात रणवीरने चक्क गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते. थ्री लेअरच्या या सूटमध्ये त्याला पाहून अनेकजण थक्कच झाले. गुरूवारी रणवीर एमयूडी स्टुडिओच्या उद्घाटनाला गेला होता. या उद्घाटनाला आलेल्या रणवीरने सफेद टी- शर्ट आणि पॅन्टवर गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते. या त्याच्या हटके लूकमध्ये तो नेहमीप्रमाणेच हॅण्डसम दिसत होता यात काही वाद नाही.
सहसा गुलाबी हा मुलींसाठीचा रंग आणि निळा हा मुलांसाठीचा रंग मानला जातो. पण रंगावर कोणाचीही मक्तेदारी नाही हेच जणू रणवीर सर्वांना त्याच्या कृतीतून दाखवून देत आहे. स्प्रिंग २०१८ मध्ये मनीष अरोराने महिलांसाठी हे जॅकेट डिझाइन केले होते.

Suit suit karda?

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

Rock Royalty ⚜️ #bappi

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

First Published on February 9, 2018 8:57 pm

Web Title: ranveer singh can look sexy even in a womans jacket