करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्याचे पाहायला मिळाले. काहींनी त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित न करता चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे एक-दोन नव्हे तर चक्क सात चित्रपट आहेत. हे चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रणवीरच्या ’83’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. संजीव कपूर यांच्या कॉमेडी चित्रपटाचा रिमेक रोहित शेट्टी करत आहे. या चित्रपटाच नाव ‘सर्कस’ असून रणवीरचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. सर्कसमध्ये रणवीरसोबत पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस आणि वरुण शर्मा दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण मार्चपर्यंत संपणार आहे.
View this post on Instagram
याशिवाय रणवीर यशराज फिल्म्सच्या ‘जयेशभाई जिगर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सर्कसनंतर रणवीर पुन्हा एकदा एका रोमँटिक चित्रपटात आलिया भट्टसोबत मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल महिन्यात सुरु करण्यात येणार आहे. रणवीर झोया अख्तर आणि अली अब्बास जफरसोबत आणखी एका चित्रपटात काम करणार आहे. याशिवाय संजय लीला भंसाळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘मिस्टर इंडिया’ च्या रिमेकमध्येही रणवीर दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
एवढच नव्हे तर, २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या यशराजच्या सुपरहिट फ्रेंचायझी ‘धूम’च्या चौथ्या भागात रणवीर मुख्य भूमिकेत असेल अशा चर्चा आहेत. या चित्रपटात रणवीर जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खान प्रमाणे खलनायकाची भूमिका साकारणार आहे. तर पुढच्या दोन वर्षात रणवीर एकत्र ७ चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 1:55 pm