20 November 2019

News Flash

दीपिकाच्या फोटोवर रणवीरने दिली ही कमेंट

काही दिवसांपूर्वीच दीपिकाने रणवीरला 'बेस्ट पति' असे म्हटले होते

रणवीर सिंग

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या बॉलिवूडमधील बेस्ट कपल म्हणून ओळखले जात आहेत. दीप-वीर ऐकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत प्रेम व्यक्त करत असतात. याचे एक उदाहरण म्हणजे दीपिकाने शेअर केलेल्या फोटोवरील रणवीरची कमेंट.

नुकताच दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिकाने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला असून दीपिका या टॉपमध्ये अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिचा हा फोटो पाहताच रणवीरने दीपिकाबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. ‘दिल ले गए डिंपल तेरे’ अशी कमेंट रणवीरने केली आहे.

दरम्यान दीपिकाच्या दुसऱ्या फोटोवर रणवीरने ‘गुड सिंधी बहू’ अशी देखील कमेंट केली आहे. रणवीरची ती कमेंट वाचतात चाहते रणवीरवर फिदा झाले आहेत. त्याची ही कमेंट आणि दीपिकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने रणवीरला ‘बेस्ट पति’ असे म्हटले होते.

सध्या दीपिका तिचा आगामी चित्रपट ’83’मध्ये व्यग्र आहे. दीपिकाच्या या आगामी चित्रपटामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार असून तो माजी क्रिकेटर कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर दीपिका त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.

First Published on June 25, 2019 1:37 pm

Web Title: ranveer singh commented on deepika padukone photo avb 95
Just Now!
X