22 November 2019

News Flash

पराभवानंतर रणवीरने पाकिस्तानी चाहत्याचं केलं सांत्वन

रणवीरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत-पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये मँचेस्टरमध्ये सामना खेळवला गेला. या सामन्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. हा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी अभिनेता रणवीर सिंग मँचेस्टरच्या मैदानावर पोहोचला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी पराभूत केलं होतं. एकीकडे सामन्यादरम्यान रणवीरने टीम इंडियासाठी चिअर्स केलं तर दुसरीकडे पाकिस्तानच्या पराभवानंतर त्याने पाकिस्तानी चाहत्याचं सांत्वन केलं.

रणवीरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पराभवाच्या दु:खात असलेल्या चाहत्याला मिठी मारत रणवीर त्याला समजावत आहे, ‘पुन्हा संधी मिळतेच. निराश किंवा नाराज होऊ नकोस. खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि ते पुन्हा दमदार खेळतील.’ त्यानंतर चाहत्याने रणवीरचे आभार मानले.

मँचेस्टरच्या मैदानावर रणवीरने धमाल मस्ती केली. हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग यांच्याशी त्याने संवाद साधला. विराट कोहलीला मैदानावर मिठी मारली. तर बॅकस्टेजवर सुनील गावस्कर यांच्यासोबत ‘बदन पे सितारे’ गाण्यावर ठेका धरला. एकंदरीत रणवीरने या सामन्याचा व क्रिकेटर्सशी झालेल्या भेटीचा पुरेपूर आनंद लुटला होता.

First Published on June 18, 2019 4:50 pm

Web Title: ranveer singh consoling a pakistani fan after india victory ssv 92
Just Now!
X