News Flash

दीप- वीरच्या लग्नासाठी सजला व्हिला, पाहा फोटो

या लग्नासाठी व्हिला परिसरात रविवारपासून लगबग सुरू झाली आहे.

लेक किमो मधल्या व्हिला दी बाल्बिआनेलो येथे कोंकणी आणि सिंधी पद्धतीनं विवाहसोहळा होणार आहे.

बॉलिवूडमधली सर्वाधिक लोकप्रिय जोडी दीपिका आणि रणवीर हे दोघंही या आठवड्यात इटलीत विवाहबंधनात अडकणार आहे. नयनरम्य अशा लेक किमो परिसरातील व्हिला दी बाल्बिआनेलो येथे दीप-वीरचा आलिशान विवाहसोहळा रंगणार आहे. या लग्नासाठी व्हिला परिसरात रविवारपासून लगबग सुरू झाली आहे.

(छाया सौजन्य : ANI)

यापूर्वीही हॉलिवूडमधल्या अनेक बड्या कलाकरांचा विवाहसोहळा येथे पार पडला होता. इटलीत विवाह करणारं दीपिका आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधलं दुसरं जोडपं आहे. सातशे वर्षे जुना असा हा व्हिला लेक किमो परिसरातला सुंदर व्हिला मानला जातो.

रोमन शैलीचा प्रभाव इथल्या प्रत्येक गोष्टीवर जाणवतो. जुनं आणि आधुनिकतेचा मेळ साधत लेक किमोच्या किनाऱ्यावर वसलेल्या या व्हिलानं इटलीच्या संपन्न इतिहासाच्या खुणा जपल्या आहेत. त्याचं सौंदर्य दरवर्षी अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं.

(छाया सौजन्य : ANI)

खास दीपिका पादुकोन आणि रणवीरच्या लग्नासाठी व्हिला आठवडाभर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी कोंकणी आणि सिंधी पद्धतीनं दिपिका रणवीरचा विवाह इथे पार पडणार आहे. इथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून मोजक्याच व्यक्तींना इथे प्रवेश देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 2:13 pm

Web Title: ranveer singh deepika padukone villa del balbianello wedding venue photos
Next Stories
1 Video : रणवीर सिंगने तेजस्विनीला दिलं खास दिवाळी गिफ्ट
2 लग्नाच्या फोटोंचे हक्क विकले, प्रियांका कमावणार कोट्यवधी
3 ‘सुपर ३०’ची धुरा कबीर खान यांच्या खांद्यावर ?
Just Now!
X