News Flash

रणवीरच्या घरी लगीनघाई, पार पडला हळदी समारंभ

रणवीरने त्याच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये डान्सदेखील केला.

गेल्या अनेक दिवसापासून चर्चेचा विषय ठरत असलेल्या दीपिका-रणवीरची लग्नघटिका जवळ येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने या दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली असून काही दिवसापूर्वीच दीपिकाने नंदीपूजा करत लग्नातील पहिला विधी पार पाडला. त्यानंतर रणवीरच्या घरीली लग्नाची लगबग दिसून आली आहे. नुकतंच रणवीरच्या घरी हळदीची समारंभ झाला.

दीपिका-रणवीर येत्या १४-१५ नोव्हेंबरला डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. त्यादृष्टीने या दोघांनीही नवीन आयुष्यासाठी वाटचाल सुरु केली असून रणवीरच्या घरी हळदीचा समारंभ झाला. यावेळी रणवीरच्या जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. विशेष म्हणजे यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मादेखील यावेळी उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

The wedding season has officially kicked off! @ranveersingh snapped at his Haldi ceremony today.

A post shared by Filmfare (@filmfare) on


सध्या या समारंभातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून रणवीर या समारंभाचा पूरेपुर आनंद घेताना दिसत आहे. साधारण दोन तास रंगलेल्या या कार्यक्रमामध्ये रणवीरने त्याच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये डान्सदेखील केला.

दरम्यान, रणवीर-दीपिकाचं लग्न सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतींनी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सिंधी रितीप्रमाणे रणवीर- दीपिकाच्या लग्नातील सोहळे रंगणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 9:32 am

Web Title: ranveer singh deepika padukone wedding haldi ceremony kicks off at ranveer singh home
Next Stories
1 संजय लीला भन्साळी ‘करण-अर्जुन’ला एकत्र आणणार ?
2 साराच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाला विरोध; पुजाऱ्यांकडून बंदीची मागणी
3 Video : ५१ वर्षीय ‘धकधक गर्ल’चा हा अफलातून डान्स सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X