19 September 2020

News Flash

‘मेरी भी शादी करवाओ’; दीप- वीरच्या फोटोंवर सोनाक्षीची प्रतिक्रिया

सोनाक्षी लग्नासाठी उत्सुक असल्याचेच यातून सुचित होत आहे

दीपवीर यांचे नुकतेच इटलीमध्ये लग्न झाले. बॉलिवूडमध्ये जोरदार गाजलेल्या या लग्नाची सगळीकडेच जोरदार चर्चा होताना दिसत आहे. इटलीतील लेक कोमा परिसरात लग्न केलेले बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नुकतेच मुंबईमध्ये परत आले आहेत. आपल्या लग्नाचा एकही फोटो आणि व्हिडियो लीक होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. नुकतेच या दोघांनीही आपले फोटो सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली आणि त्यावर सामान्यांबरोबरच बॉलिवूडमधील कलाकारांनीही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

लग्नसमारंभातील वेगवेगळ्या विधींचे आणि या देखण्या जोडप्याचे फोटो पाहून कोणालाही लग्न करण्याची इच्छा होईल. लुटेरामध्ये रणवीर सिंगची सहकलाकार असलेल्या सोनाक्षी सिन्हाने हे फोटो पाहून आपल्यालाही लग्न करायचे असल्याचे म्हटले आहे. तिने याबाबत रणवीरच्या फोटोवर प्रतिक्रीया दिली आहे. ती लिहीते, ”नजर ना लगे बाबा और बेबी को, बस अब मेरी करा दो” आता ती हे सगळे म्हणत असली तरीही तिचा जोडीदार कोण असेल याबाबत मात्र उत्सुकता आहे. त्यामुळे सोनाक्षी लग्नासाठी उत्सुक असल्याचेच यातून सुचित होत आहे.

उद्या बेंगळुरु येथे दीप आणि वीरचे रिसेप्शन होणार असून त्याला कोण कोण उपस्थित राहणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. काही वेळापूर्वीच त्यांचा बेंगळुरुला जातानाचा व्हिडियोही सोशल मीडियावर झळकला आणि या नवदांपत्याची आणखी एक छबी सर्वांना पाहायला मिळाली. या दोघांनीही स्वत:साठी मुंबईतील जुहू परिसरात आलिशान घर विकत घेतल्याचे समजत असून लवकरच ते या घरी राहायला जातील असं म्हटलं जात आहे. नुकतेच या दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर फोटो अपलोड केले आहेत. त्यामध्ये त्यांच्या मेहंदी कार्यक्रमापासून ते प्रत्यक्ष लग्नापर्यंतचे अनेक क्षण टिपले गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 7:57 pm

Web Title: ranveer singh deepika padukone wedding photos sonakshi sinha give reaction that she want to get married
Next Stories
1 अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात
2 Video: ‘काफीराना सा है, इश्क है या क्या है’; सारा- सुशांतची रोमॅण्टिक केमिस्ट्री
3 आदेश श्रीवास्तव यांच्या मुलाचं संगीत क्षेत्रात पदार्पण
Just Now!
X