02 March 2021

News Flash

शाहिदमुळे रणवीर सिंगला जाणवतोय धोका!

शाहिदने चित्रपट स्विकारण्यासाठी एक अट ठेवली होती.

बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साली याने युद्धाचे मैदान अद्याप तयार केलेले नसतानाच राजा रावल रतन सिंह आणि अलाउद्दीन खिलजी यांच्या तलवारी म्यानातून बाहेर आल्या आहेत. विशेष म्हणजे या तलवारी ‘पद्मावती’साठी नाही तर दुस-याच कारणासाठी बाहेर आल्या.
संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या कलाकारांवर मोहर लागली आहे. दीपिका पदुकोण ‘पद्मावती’, शाहिद कपूर तिचा पति ‘राजा रावल रतन सिंह’ आणि रणवीर सिंह हा ‘अलाउद्दीन खिलजी’ यांच्या दिसेल. या चित्रपटात शाहिदची एण्ट्री झाल्यानंतर दोन कलाकारांमध्ये ‘इगो’ आड येत असल्याच्या बातम्या येत आहेत. शाहिद हा प्रतिभावान आणि हरहुन्नरी अभिनेता आहे. त्याचा एक चांगला चाहता वर्गही आहे. पण पद्मावती चित्रपटामध्ये शाहिदला घेतल्यामुळे रणवीर सिंगला असुरक्षित वाटत असल्याची चर्चा आहे. शाहिद सर्व प्रसिद्धी तर घेऊन जाणार नाही ना, अशी भीती रणीरला वाटतेय. खरं तर शाहिदने हा चित्रपट स्विकारण्यासाठी एक अट ठेवली होती. पडद्यावर कोणत्याही किमतीत त्याची उंची रणवीरपेक्षा कमी दाखवली जाणार नाही अशी अट त्याने घातल्याचे म्हटले जातेय. तर दुसरीकडे, रणवीरला या चित्रपटात मुख्य भूमिकेत एकच व्यक्ती हवा होता. पण शाहिद आल्यामुळे रणवीरला तगडी टक्कर मिळाली आहे. याच कारणामुळे रणवीरला शाहिदसोबत चित्रपटाचा पोस्टर शेअर करायचा नाहीये. या नव्या समस्येला मार्गी लावण्यासाठी भन्सालीने तिनही मुख्य कलाकारांचे वेगवेगळे पोस्टर काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. एकाच चित्रपटात मोठी स्टारकास्ट असल्यावर असे अडथळे येतचं असतात. पण संजय लीला भन्सालीला अशा अडथळ्यांना योग्य पद्धतीने दूर करता येते.  ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये १३ ते १४ व्या शतकातील चित्रण साकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्या काळची मेवाडची समृद्ध संस्कृती पाहता त्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या रुपाने पुन्हा एका रंजक ऐतिहासिक काळाचा आणि कथानकाचा उलगडा होणार आहे. येणाऱ्या काळात ‘पद्मावती’चे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून या चित्रपटात ऐतिहासिक काळाच्या पार्श्वभूमीचा आधार घेत संजय लीला भन्साळी अल्लाउद्दीन खिलजी आणि मेवाडची राणी पद्मावती यांच्याशी निगडीत कथानकावर चित्रपट साकारत आहेत. ‘पद्मावती’च्या निमित्ताने सिनेरसिकांना शाहिद आणि दीपिकाच्या रुपात एका नव्या जोडीला एकत्र पाहण्याची संधी मिळेल.
सध्या शाहिद कपूर त्याच्या मुलीच्या जन्मामुळे बराच आनंदात आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिद आणि मीरा त्यांच्या बाळाला गुरुजींचा आशिर्वाद मिळावा म्हणून अमृतसरला गेले होते. तिथे तिचे नावही ठरणार असल्याचे कळते. रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘बेफिक्रे’ चित्रपटात व्यस्त आहे. रणवीरसोबत या चित्रपटात वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एकिकडे मानधन वाढवण्याच्या मागणीमुळे चर्चेत आलेली दीपिका तुर्तास ‘xxx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारण्यात व्यस्त आहे. विन डिझेलसेबतचा तिचा बहुप्रतिक्षित असा हा ‘xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 3:23 pm

Web Title: ranveer singh doesnt want shahid kapoor to feature in his poster of padmavati
Next Stories
1 ‘माझ्यासाठी बाप्पा म्हणजे माझा मेहुणाच’
2 राजेंद्र-स्मिता बनले ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉण्टेड’
3 ‘कॉम्प्लिकेटेड रिलेशनशीप’मध्ये असल्याची प्रियांकाची कबुली
Just Now!
X