06 March 2021

News Flash

चाहत्याच्या मृत्यूमुळे रणवीरला बसला धक्का, शेअर केले सोबतचे फोटो

हा चाहता रणवीरचा अत्यंत जवळचा होता

रणवीर सिंग

बॉलिवूड कलाकार म्हटलं की त्यांचे असंख्य चाहते हे ओघाओघाने आलेच. त्यातच अभिनेता रणवीर सिंगचा फॅनफॉलोअर्स तर कमालीची आहे. ‘गली बॉय’,’सिम्बा’ या चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. रणवीरदेखील त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा कायम प्रयत्न करत असतो. इतकंच नाही तर तो त्याच्या फॅन्सला खूप स्पेशल पद्धतीनेही ट्रीट करत असतो. या फॅनपैकीच रणवीरच्या एका अत्यंत जवळच्या चाहत्याचा मृत्यू झाला असून त्याच्या निधनाची माहिती मिळताच रणवीरही प्रचंड भावूक झाला आहे. रणवीरने सोशल मीडियावर या चाहत्याचा फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रणवीरच्या फॅनफॉलोअर्समधील जतीन दुलेरा हा रणवीरचा मोठा चाहता होता. अनेक वेळा जतीनने रणवीरची भेट घेत, त्याच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र जतीनचं आकस्मिक अपघातात निधन झालं आहे. या घटनेची माहिती रणवीरने सोशल मीडियावर दिली आहे.

ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असलेल्या जतीनचा बाथरुममध्ये असताना अचानक श्वास कोंडला आणि त्याच जागी तो जमिनीवर कोसळला. यामध्येच त्याचा मृत्यू झाला. जेव्हा ही गोष्ट रणवीरला समजली तेव्हा त्याच क्षणी त्याने सोशल मीडिया अकाऊंटवरुन जतीनच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलं. रणवीरने अंतिम श्रद्धांजली वाहताना RIP LIL HOMIE असे लिहिले. त्यासोबतच जतीनबरोबरचे ४ फोटोजचे कोलाज तयार करुन फोटो शेअर केला.

दरम्यान, रणवीर सध्या लंडनमध्ये ’83’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. हा चित्रपट १९८३ च्या विश्वचषकावर आधारित असून या चित्रपटामध्ये तो तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 12:46 pm

Web Title: ranveer singh fan death ranveer share post social media ssj 93
Next Stories
1 ‘ही’ टीव्ही अभिनेत्री झाली सुष्मिता सेनची नणंद
2 या टॅटूमुळे आमिर खानची मुलगी सोशल मीडियावर चर्चेत
3 इशा देओलला कन्यारत्न, जाणून घ्या तिच्या बाळाचं नाव
Just Now!
X