वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये मँचेस्टरमध्ये सामना खेळवला जात आहे. या लढतीसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ आणि त्यांचे चाहते पूर्णपणे सज्ज आहेत. सामन्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. यामध्ये सेलिब्रिटीसुद्धा मागे नाहीत. एकीकडे शाहरुख खान त्याच्या मुलासह हा महामुकाबला पाहत आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंग थेट मँचेस्टरच्या मैदानावर पोहोचला आहे.

मँचेस्टरच्या मैदानावर रणवीरचे समालोचन पाहायला मिळाले. अर्थात, जेवढे लक्ष या लढतीकडे आहे तेवढेच पावसाकडेही आहे. सामना सुरू होण्यापूर्वी रणवीरने तिथलं वातावरण कसं आहे हे सांगितलं. यावेळी त्याने हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग यांच्याशीही संवाद साधला.

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये तत्कालीन कर्णधार कपिल देवची भूमिका रणवीर साकारणार आहे. ‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.