News Flash

दीपिकानेच रणवीरला केलं ट्रोल; वाचा तिची भन्नाट कमेंट

दीपिकानंतर अर्जुन कपूरनेही रणवीरची फिरकी घेतली.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

अभिनेता रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे चाहते भरपूर आहेत. त्याचसोबत त्यांची ऑफस्क्रीन मजामस्तीसुद्धा चर्चेचा विषय ठरते. दोघांपैकी एखाद्याने सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केला आणि दुसऱ्याने त्यावर कमेंट केली नाही, असं होतंच नाही. जाहीररित्या प्रेम दाखवण्यात हे जोडपं कधीच मागे राहिलं नाही, त्याचप्रमाणे खुलेपणाने ते एकमेकांची मस्करीही करताना दिसतात. याची प्रचिती पुन्हा एकदा आली. रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आणि त्या फोटोवरून दीपिकानेच त्याला ट्रोल केलं.

वाघासोबतचा फोटो रणवीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आता हे कोणी केलं?’ खरंतर याच पोझमधला फोटो अमेरिकेत प्राणी संग्रहालयाची देखभाल करणाऱ्या जो एक्झॉटिकचा आहे. त्याच्याच लूकमध्ये रणवीर या फोटोत पाहायला मिळत आहे. पण हा फोटो दीपिकाला काही नवीन नाही वाटला. त्यावर कमेंट करत ती रणवीरला म्हणाली, ‘यात तुला कोणती गंमत दिसतेय? तू तर नेहमीच अशा लूकमध्ये असतोस.’ दीपिकानंतर अर्जुन कपूरनेही रणवीरची फिरकी घेतली. ‘बाबा, तुझ्यासाठी हा नेहमीचा लूक आहे’, असं तो म्हणाला.

आणखी वाचा : ‘काही जोकर्समुळे पसरतोय करोना’; लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर भडकला सलमान

लॉकडाउनमध्ये रणवीर-दीपिका एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या संपर्कात आहेत. हे दोघं लवकरच ’83’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच हे दोघं स्क्रीन शेअर करत आहेत. दीपिकाने चित्रपटात रणवीरच्या पत्नीचीच भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 11:29 am

Web Title: ranveer singh gets hilariously trolled by deepika padukone ssv 92
Next Stories
1 …म्हणून चित्रपटगृहाच्या बाहेर दिव्यांकाने त्या व्यक्तीच्या कानाखाली लगावली
2 अभिनेते रणजित चौधरी कालवश
3 “माझ्या पाकिटात कायम चार्ली चॅप्लिनचा फोटो असतो, कारण…”; अक्षय कुमारनेच दिली होती माहिती
Just Now!
X