News Flash

रणवीरनं चौकशीदरम्यान दीपिकासोबत उपस्थित राहू देण्याची एनसीबीकडे केली मागणी, कारण…

दीपिकाची २६ सप्टेंबर म्हणजेच उद्या चौकशी होणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आलं. त्याची अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे चौकशी सुरु आहे. या चौकशीमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दिया मिर्झा या कलाकारांची नावे समोर आली होती. याच प्रकरणात चौकशीसाठी एनसीबीनं दीपिकाला समन्स बजावल्यानंतर ती चौकशीसाठी पती रणवीरसह गोव्याहून मुंबईमध्ये दाखल झाली आहे.

दीपिकाची २६ सप्टेंबर म्हणजेच उद्या (शनिवारी) एनसीबीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीपूर्वीच अभिनेता रणवीर सिंहने चौकशीदरम्यान दीपिकासोबत उपस्थित राहण्यासाठी एनसीबीकडे विनंती केली आहे. कारण कधीकधी दीपिकाला घाबरल्यामुळे पॅनिक अटॅक येतात. त्यामुळे आपल्याला चौकशीदरम्यान उपस्थित राहु द्यावं, अशी मागणी त्यानं एनसीबीकडे केली आहे.

दरम्यान, रणवीरने चौकशीदरम्यान त्या ठिकाणी उपस्थित राहण्यास परवानगी दिली जात नसल्याची कल्पना असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी एनसीबी कार्यालयात येण्याची परवानगी दिली जावी अशी विनंती रणवीरने केली आहे. रणवीरच्या या विनंतीवर एनसीबीने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D-दीपिका पदुकोण, N-नम्रता शिरोडकर, S- श्रद्धा कपूर आणि K -करिश्मा) ही नावे समोर आली आहेत. एनसीबीच्या एका व्हॉट्सअॅप चॅटमधून या नावांचा खुलासा झाला आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 12:32 pm

Web Title: ranveer singh gives application to ncb says if he can be present during deepika padukone questioning avb 95
Next Stories
1 फिरोज खान यांनी ‘या’ तरुणीसाठी सोडले होते पत्नीला
2 एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक; सलमाननं केलं ट्वीट, म्हणाला…
3 ड्रग्स प्रकरण : रकुल प्रीत पाठोपाठ करिश्मा प्रकाशही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल
Just Now!
X