काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरचा मस्कुलर बॉडी कमावलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्या या फोटोकडे पाहून सुरुवातीला तो रणबीरच आहे यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. आता त्याच्या पाठोपाठ रणवीर सिंगचाही एक सिक्स पॅक अॅब्स असलेला लूक व्हायरल झाला आहे. रणवीरच्या ट्रेनरने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…म्हणून विवेक ऑबेरॉयच्या भावाने अॅशला दिला नकार

रणवीरच्या ट्रेनरने त्याचा ३ महिन्यांपूर्वीचा आणि त्यानंतरचा असे दोन फोटो शेअर केलेत. या दोन्ही फोटोंकडे पाहून रणवीरने स्वतःमध्ये किती बदल केला हे स्पष्ट दिसते. सहा आठवड्यांची रणवीरची मेहनत त्याच्या शरीरावर चांगलाच दिसून येतोय.

रणवीर सिंगचा खासगी ट्रेनर लॉयड स्टीवन्सने या फोटोला कॅप्शन देत म्हटले की, मी अगोदर हा फोटो शेअर केला नाही. मात्र जेव्हा पण हा फोटो पाहतो तेव्हा मला रणवीरचा प्रचंड अभिमान वाटतो. यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. रणवीरच्या प्रचंड मेहनतीची दाद द्यावी तेवढी कमीच आहे. कारण बऱ्याचदा रणवीर चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे आम्ही रात्री व्यायाम करायचो. एवढेच काय तर भल्या पहाटेही आम्ही व्यायाम केला आहे. फक्त ६ आठवड्यात आम्ही ही शरीरयष्ठी कमावली आहे.

…म्हणून रणवीर जबरदस्ती भूमी पेडणेकरच्या बाथरूममध्ये घुसला

दरम्यान, रणवीर सिंग आणि त्याच्या करामती या सर्वांनाच माहित असतात. तो कोणतीच गोष्ट शांत बसून करत नाही. तो जिथे असेल तिथे उत्साह ओसंडून वाहत असतो. रणवीरने टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाचे प्रमोशनही अगदी वेगळ्या पद्धतीने केले. इन्स्टाग्रामच्या एका मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तो भूमी पेडणेकरच्या बाथरूममध्ये घुसतो. भूमीच्या अचानक ओरडण्यामुळे तोही जोरजोरात ओरडत देशात शौचालय कमी असल्यामुळे तो टॉयलेटचा वापर करत असल्याचे सांगितले. रणवीरने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिले की, जेव्हा तुम्हाला जायचे असेल तेव्हा हा सिनेमा पाहायला नक्की जा असे लिहिले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh got jacked as hell in just 6 weeks here is a before after picture for proof
First published on: 09-08-2017 at 19:29 IST