News Flash

रणवीरच्या घड्याळाच्या किंमतीत तुमच्या दोन-तीन फॉरेन ट्रीप नक्कीच होतील

या घड्याळाची किंमत पाहून तुम्हाला धक्काच बसेल

रणवीरच्या घड्याळाची किंमत

अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या आगळ्यावेगळ्या फॅशनसाठी बॉलिवूडबरोबरच त्याच्या चाहत्यांमध्येही लोकप्रिय आहे. अगदी त्याचा आवडता टकसुडो घालण्यापासून ते फ्लोरोसंट रंगाचे कपडे घालण्यापर्यंत रणवीरचे अनेक फॅशनेबल प्रयोग कायमच चर्चेचा विषय ठरतात. पुरुषांच्या फॅशनकडे पाहण्याचा दृष्टीकोन रणवीरमुळे बदलल्याचं त्याचे चाहते म्हणतात. नुकताच त्याचा आणखीन एक स्टायलिस्ट अवतार दिसून आला तो.

नुकताच पार पडलेल्या स्टार स्क्रीन अवॉर्ड्स २०१९ हा सोहळा पार पडला. या अवॉर्ड फंक्शनला दीपिका आणि रणवीरने हजेरी लावली. रणवीरने काळ्या रंगाचा सूट घालून सोहळ्याचा आला होता. नेहमीप्रमाणे रेडकार्पेटवर त्याने फोटोग्राफर्सला बऱ्याच पोझेस देत इतर सेलिब्रिटीजबरोबरही फोटो काढून घेतले.

 

View this post on Instagram

 

Metallica! #ranveersingh in #gauravGupta #saintlaurent #franckmukller for #starscreenawards2019 #styling #redcarpet @sheldon.santos

A post shared by Nitasha Gaurav (@nitashagaurav) on

त्याच्या कपड्यांबरोबरच त्याने घातलेल्या अॅक्सेसरीजनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतलं. मग तो काळ्या रंगाचा गॉगल असो किंवा फॉर्मल शूज किंवा हातातील घड्याळ. खास पुरस्कार सोहळ्यास रणवीर खास तयारी करुन आला होता हे त्याला पाहताच समजत होते. आता तुम्ही म्हणाल की त्याच्या घड्याळामध्ये काय खास होतं तर आम्ही सांगू इच्छितो की या घड्याळाची किंमत १३ लाख ८२ हजार ४०० रुपये इतकी आहे. थोड्यात सांगायचं तर इतक्या रक्कमेमध्ये एखाद्या सामान्य व्यक्तीला दोन ते तीन परदेश दौरे आरामात करता येतील.

© Franck Muller

© Viral Bhayaniरणवीरचे घड्याळ हे फ्रॅक मुलर्स आयर्न क्रॉको कंपनीचे आहे. हे घड्याळ क्रॉको सिरीजमधील लिमीटेड एडिशन वॉच आहे. या घड्याळाच्या डायलला रोऱ्होडीयमचे प्लेटींग आहे.

 

View this post on Instagram

 

@ranveersingh spotted wearing @franckmuller_geneve iron croco watch ₹13,82,400. The exotic Black Croco Collection from Franck Muller, first launched in 2011, was bold. It was a daring timepiece for the sartorially-confident man who had no qualms about making a statement. Two new additions, the Iron Croco and Gold Croco Collections join its predecessor, with 3-D scales in steel and gold variation. The crocodile skin patterns are further complemented with a black hand-sewn alligator strap, as a finishing touch. #ranveersingh#hype#adidas#nas#badboy#styleofdday#simba#rohitsheety#dhadak#nike#celebrity#fashion#khushikapoor#bollywood#Style#instalike#mumbai#beyondtheclouds#india#jhanvikapoor#instadaily#instalove#trailerofdhadak#instafollow#celebslife#btownstylespotter#btownstyle#instalove#instalike#btownstyle#rolex#rich#luxury Tag ur Friends Comment Like Share and Follow Us for more updates

A post shared by btownstylespotter (@btownstyles) on

सध्या नेटकऱ्यांमध्ये रणवीरच्या याच घड्याळाची चर्चा आहे. रणवीरच्या चाहत्यांनी इतकं महागडं घड्याळ घालणाऱ्या आपल्या आवडत्या अभिनेत्याचे कौतुक करताना, ‘आपना टाइम आऐगा’ हे रणवीरने खरं करुन दाखवल्याची भावना व्यक्त केली आहे. रणवीरने घातलेले शूज हे सेंट लॉरेण्ट या ब्रॅण्डचे होते. तर त्याने घातलेला गॉगल हा निताशा गौरवने त्याला सुचवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 5:57 pm

Web Title: ranveer singh iron watch worth rs 1382400 scsg 91
Next Stories
1 ‘या’ फोटोमुळे सोहाला मागावी लागली सैफची माफी
2 गुगलवर सर्वाधिक सर्च होतेय ‘ही’ हॉट अभिनेत्री
3 प्रियांकाने शेअर केला मांजरीचा व्हिडीओ; तुमच्या चेहऱ्यावरही येईल हसू
Just Now!
X