31 October 2020

News Flash

रणवीरच्या ‘या’ टोपीच्या किंमतीत तुमची संपूर्ण उन्हाळ्याची होईल शॉपिंग

या 'मेड इन इटली' कॅपची किंमत ही सर्वसाधारण बेसबॉल कॅपच्या २० पटींनी अधिक आहे.

रणवीर सिंग

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो जास्त चर्चेत असतो. रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र ढंगामध्ये हजर होतो. त्याच्या अतरंगी फॅशनची चर्चा होणार नाही असं होतंच नाही. रणवीरने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नुकताच एक सेल्फी पोस्ट केला. या सेल्फीमध्ये त्याने घातलेल्या निळ्या टोपीची किंमत ऐकून तुम्ही थक्कच व्हाल. या टोपीच्या किंमतीत संपूर्ण उन्हाळ्याची शॉपिंग होईल.

काळ्या रंगाच्या एब्रॉयड्रीमध्ये लोगो प्रिंट केलेला निळ्या रंगाचा हा बेसबॉल कॅप आहे. ‘ऑफ व्हाइट’ असं या टोपीच्या ब्रँडचं नाव आहे. या ‘मेड इन इटली’ कॅपची किंमत ही सर्वसाधारण बेसबॉल कॅपच्या २० पटींनी अधिक आहे. सुमारे २० हजार रुपयांची ही टोपी आहे. ज्यामध्ये संपूर्ण उन्हाळ्याची शॉपिंग सहजरित्या होऊ शकते. हो ना?

आणखी वाचा : या मालिकेने तेजस्विनीच्या पाठीवर दिली आयुष्यभराची खूण; शूटिंगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

एरवी शूटिंगमुळे एकमेकांना पुरेसा वेळ देता न आल्याने लॉकडाउनच्या काळात रणवीर व दीपिका एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. दीपिकाने सध्या ‘वर्क फ्रॉम होम’सुद्धा सुरू केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 1:27 pm

Web Title: ranveer singh just wore an expensive blue cap at home and it costs more than our entire summer wardrobe ssv 92
Next Stories
1 माँ के हात का खाना! तब्बल ४६ वर्षानंतर ट्विंकलला मिळालं आईच्या हातचं जेवण
2 त्या ट्विटनंतर अकाऊंट डिलीट करण्याचे कारण सांगितले झायरा वसीमने
3 Video : सोनू सूदसमोर सर्वात मोठे आव्हान, चिमुकलीने केली अनोखी मागणी
Just Now!
X