30 November 2020

News Flash

रणवीरच्या या जाहिरातीमुळे सुशांतचे चाहते भडकले, केली बॉयकॉट करण्याची मागणी

जाणून घ्या कारण..

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी सुशांतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले तर काहींनी नैराश्यामुळे सुशांतने इतके टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सचे चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. दरम्यान बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची एक जाहिरात बॉयकॉट करण्याची मागणी सुशांतच्या चाहत्यांनी केली आहे.

नुकताच रणवीरची बिंगोची नवी जाहिरात प्रदर्शित झाली आहे. या जाहिरातीमध्ये रणवीर बिंगो खाताना दिसत आहे. जाहिरातीच्या सुरुवातीला रणवीरच्या घरी काही पाहुणे आले असल्याचे दिसत आहे. हे पाहुणे रणवीरला त्याच्या भविष्यासाठी काय प्लॅन आहेत का असे विचारतात. तेव्हा रणवीर बिंगो खातो. त्यानंतर मार्स, फोटॉन, एलियन या शब्दांचा वापर करत उत्तर देतो आणि पाहुण्यांचे तोंड बंद करतो.

या जाहिरातीमध्ये रणवीरने वापरलेले शब्द पाहून सुशांतच्या चाहत्यांनी रणवीरवर निशाणा साधला आहे. त्यांनी ही जाहिरात बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. दरम्यान ट्विटवर हॅशटॅग BoycottBingo देखील ट्रेंड होताना दिसत होता.

या जाहिरातीच्या माध्यमातून रणवीरने सुशांतची खिल्ली उडवली आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणून त्यांनी रणवीरवर निशाणा साधत जाहिरात बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 2:54 pm

Web Title: ranveer singh new bingo ad boycott by sushant singh rajput fans avb 95
Next Stories
1 ‘जिगरबाज’मध्ये दिसणार प्रतीक्षा लोणकरांचा नवा अंदाज; साकारणार ‘ही’ भूमिका
2 Birthday Special : या प्रश्नाचे उत्तर देत सुष्मिता सेनने जिंकला होता ‘मिस युनिव्हर्स’चा किताब
3 बहीण कृष्णाचा बोल्ड अंदाज पाहून टायगर झाला अवाक्; म्हणाला…
Just Now!
X