बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. फार कमी वेळात त्याने चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. म्हणूनच तो जिथेही हजेरी लावतो, तिथे चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते. मात्र, कधी कधी सेलिब्रिटींना अशा काही घटनांना सामोरं जावं लागतं, ज्याची कल्पना त्यांनीसुद्धा केली नसणार. असाच एक अनुभव रणवीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.

हा मजेशीर किस्सा सांगताना तो म्हणाला की, ‘मी स्विमिंग पूलजवळ होतो आणि त्याचवेळी एका चाहत्याने माझा नग्नावस्थेतील व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ जर व्हायरल झाला असता तर मला खूप त्रास सहन करावा लागला असता. माझ्या चेंजिंग रुममध्ये मी पूर्ण नग्न अवस्थेत होतो. तेव्हा, एक मुलगा माझा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. सुदैवाने त्याच्या कॅमेऱ्याचा लाइट चालू असल्याने मला लगेच कळले. लाइट तो ऑफ कर लेता, तो पकडा नहीं जाता, असं ओरडतच मी त्याच्या दिशेने पळत सुटलो. त्याला पकडण्यात मला यश मिळालं आणि त्याने शूट केलेला व्हिडिओ मी डिलीट करुन घेतला.’

वाचा : हे तर अश्लिलतेचं चित्रण; ‘एक दो तीन’च्या रिमेकवर ‘तेजाब’चे दिग्दर्शक भडकले

जर हा व्हिडीओ व्हायरल झाला असता तर, मला त्याचा खूप त्रास सहन करावा लागला असता. खरं तर माझ्याबाबतीत असं नेहमीच घडत असतं, असंही रणवीर म्हणाला.

वाचा : ‘या’ व्हिडिओतून उलगडणार झहीर-सागरिकाच्या ‘प्रेमाची गोष्ट’

चाहत्यांमुळे कलाकाराला कोणता त्रास सहन करावा लागेल हे सांगता येत नाही. रणवीरच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. यामध्ये तो सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत झळकणार आहे.