News Flash

दीपिकाचे कपडे घातले का? कपड्यावरून रणवीर पुन्हा ट्रोल

रणवीरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे त्याला ट्रोल करण्यात आले आहे

दीपिकाचे कपडे घातले का? कपड्यावरून रणवीर पुन्हा ट्रोल

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो जास्त चर्चेत असतो. रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र ढंगामध्ये हजर होतो. नुकताच रणवीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याने परिधान केलेल्या कपड्यांवरुन त्याला ट्रोल करण्यात आले.

नुकताच रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा ठिपक्यांचा शर्ट परिधान केला आहे. त्यावर रंगीबेरंगी पट्यांची पॅन्ट परिधान केली आहे. रणवीरचा हा लूक जुन्या काळातील एका अभिनेत्रीच्या कपड्यांप्रमाणे वाटत असल्याने नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

एका नेटकऱ्याने तर पुन्हा दीपिकाचे कपडे परिधान केलेस का? असा प्रश्न दीपिकाला विचारला आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या आत्मविश्वासाची प्रशंसा केली आहे.

लवकरच रणवीरचा ’83’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2020 5:38 pm

Web Title: ranveer singh pairs polka dot shirt with stripe pants avb 95
Next Stories
1 वरुण धवनचा ‘डान्स’ कंगनावर पडला भारी
2 ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर
3 ‘मेकअप’साठी रिंकूने घेते इतके मानधन?
Just Now!
X