News Flash

Video : लग्नासाठी आतूर रणवीर विमानतळावर वाजवत होता ‘हे’ गाणं

दीप-वीर इटलीतील लेक कोमा येथे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

रणवीर सिंग

बॉलिवूडमधील बहुचर्चित अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणतचं लग्न येत्या आठवड्यात पार पडणार आहे. काही दिवसापूर्वीच हे दोघं इटलीला रवाना झाले आहेत. यामध्ये विमानतळावरील रणवीरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये रणवीरने स्पीकरवर मेहंदी लगा के रखना हे गाणं लावल्याचं दिसून येत आहे.

दोन दिवसांनी म्हणजे १४ तारखेला दीप-वीर इटलीतील लेक कोमा येथे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यासाठी हे दोघंही आपल्या कुटुंबासह इटलीला रवाना झाले. इटलीला निघालेल्या या जोडीचे विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यात रणवीरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून त्याच्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रणवीरच्या हातात एक स्पीकर असून त्यावर ‘मेहंदी लगा के रखना’ हे गाणं वाजत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे रणवीर लग्नासाठी चांगलाच आतुर झाल्याची प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांमधून उमटत आहे.

दरम्यान, येत्या १४ आणि १५ नोव्हेंबर मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थिती हे दोघं लग्नबंधनात करणार असून २१ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये आणि १ डिसेंबर रोजी मुंबईत स्वागतसमारंभाचं आयोजन करण्यात येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 2:15 pm

Web Title: ranveer singh play hindi song at airport for deepika padukone
Next Stories
1 दीप- वीरच्या लग्नासाठी सजला व्हिला, पाहा फोटो
2 Video : रणवीर सिंगने तेजस्विनीला दिलं खास दिवाळी गिफ्ट
3 लग्नाच्या फोटोंचे हक्क विकले, प्रियांका कमावणार कोट्यवधी
Just Now!
X