News Flash

दीपिकाच्या बिल्डिंगमध्ये रणवीरने घेतलं घर; भाडं वाचून व्हाल थक्क!

रणवीरने मुंबईतील प्रभादेवी इथल्या बोमंड टॉवर्समध्ये भाड्याने फ्लॅट घेतला आहे.

दीपिका, रणवीर

अभिनेता रणवीर सिंगने मुंबईतील प्रभादेवी इथल्या बोमंड टॉवर्समध्ये भाड्याने फ्लॅट घेतला आहे. रणवीरची पत्नी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फ्लॅट याच इमारतीत आहे. या ३३ मजली इमारतीत २६ व्या मजल्यावर दीपिकाचा 4BHK फ्लॅट आहे. २०१० साली तिने तब्बल १६ कोटींना हा फ्लॅट विकत घेतला होता.

नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रणवीरने तीन वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने घेतला आहे. पहिल्या दोन वर्षांसाठी तो तब्बल ७ लाख २५ हजार रुपये प्रति महिना भाडं देणार आहे. त्यानंतर तीसऱ्या वर्षासाठी भाड्याची किंमत वाढून ७ लाख ९७ हजार रुपये प्रति महिना भाडं तो देणार आहे. इतकी मोठी किंमत मोजून रणवीरने त्याच इमारतीत घर भाड्याने का घेतलं हे मात्र अद्याप समजलेलं नाही.

या दोघांच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दुसरीकडे दीपिकाचा ‘छपाक’ हा बहुचर्चित चित्रपट १० जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका साका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 4:17 pm

Web Title: ranveer singh rents a flat in deepika padukone building for rs seven lakh per month ssv 92
Next Stories
1 रिंकूला हवाय राजकुमार?
2 Review : काळजाचा थरकाप उडवणाऱ्या ‘Ghost Stories’
3 WWE मध्ये लगीनघाई पडली महागात; अक्षतांऐवजी पडले बुक्के
Just Now!
X