09 August 2020

News Flash

रणवीर म्हणतोय, ‘मला बाबा व्हायचंय’

काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही जोडी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. त्यातच रणवीरने त्याला बाबा होण्याची इच्छा असल्याचं एका कार्यक्रमात सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांची चर्चा रंगू लागली आहे.

रणवीरचं दीपिकावर किती प्रेम आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. रणवीरचं केवळ दीपिकावर प्रेमच नाहीये तर तो तिची काळजीही तितकीच घेतो. अलिकडेच रणवीरने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने मला बाबा व्हायचं आहे असं सांगितलं. “माझी मनापासून बाबा होण्याची इच्छा आहे. मला माझ्या मुलांसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करायचा आहे”, असं रणवीर यावेळी म्हणाला. तसंच त्याने त्याच्या करिअरविषयीही काही गोष्टींचा उलगडा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

“मला अभिनयाव्यतिरिक्त चित्रपटाचं दिग्दर्शन करायलाही आवडेल. तसंच मला लेखन करायलासुद्धा आवडतं. फावल्या वेळात मी काही ना काही लिहीत असतो”, असंही तो म्हणाला.

दरम्यान, लवकरच रणवीरची मुख्य भूमिका असलेला ’83’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तो तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत दीपिकादेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2019 1:00 pm

Web Title: ranveer singh reveal future plan for kids ssj 93
Next Stories
1 मुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल
2 अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन
3 ‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी
Just Now!
X