अभिनेता रणवीर सिंगने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीदरम्यान त्यांनी सिनेक्षेत्रातील कलाकारांना दिलेल्या सल्ल्याबद्दलचा खुलासा केला आहे. पंतप्रधान मोदींनी सिनेसृष्टीमध्ये लोकांनी ‘सर्वमावेशक भारत आणि देशातील एकत्मता’ या गोष्टींचा प्रसार करणारा कंटेन्ट निर्माण करावा असा सल्ला दिला आहे. मागील महिन्यामध्ये पंतप्रधानांनी सिनेक्षेत्रातील अनेक कलाकारांची भेट घेतली होती. यामध्ये रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आयुष्मान खुराना, करण जोहर, रोहित शेट्टी, एकता कपूर यांच्याबरोबरच इतर मान्यवरांचा समावेश होता.

याच भेटीसंदर्भातील माहिती रणवीरने नुकतीच एका मुलाखतीमध्ये दिली. ‘आम्ही नुकतेच पंतप्रधानांना भेटलो. ही भेट अगदी छान झाली. सिनेसृष्टीचा भाग असणारे आम्ही तरुण कलाकार सिनेसृष्टीसाठी काय करत आहोत याची माहिती त्यांना दिली. त्यावर बोलताना त्यांनी शक्य असल्यास सर्वमावेशक भारत आणि देशातील एकत्मतेला प्रोत्साहन देणारा कंटेन्ट निवडा असा सल्ला दिला,’ असं रणवीरने पत्रकारांशी बोलताना सांगितले. १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित माझा आगामी सिनेमा ८३ हा नक्की भारतीयांना अभिमान वाटेल असाच असेल असा विश्वास रणवीरने यावेळी बोलताना व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

Powerful and timely conversations can bring about change and this was one of what we hope will become a regular conversation. Meeting the Honorable Prime Minister @narendramodi today was an incredible opportunity. As a community, there is a huge interest to contribute to nation building. There is so much that we want to do. And can do and this dialogue was towards how and what ways we can do that. When the youngest country (in demography) joins hands with the largest movie industry in the world, we hope to be a force to reckon with. Together we would love to inspire and ignite positive changes to a transformative India. The film industry would also like to send a huge thanks for the GST reduction in movie ticket prices that was implemented recently! Thank you so much for your time, Sir!

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

‘पंतप्रधानांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर मी त्यांना माझा आगामी सिनेमा ८३ हा भारतीय संघाबद्दल असून तो तुमच्या अपेक्षेप्रमाणेच असल्याचे सांगितले. देशभरातील खेळाडू एकत्र येऊन देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करुन दाखवतात याबद्दलची ही कथा आहे. सामान्यांमधील असामन्यांची ही कथा असून मी या सिनेमाचा भाग असल्याबद्दल मला अभिमान वाटतो,’ असं रणवीरने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकांचे मनोरंजन करणे हा माझ्या आयुष्याचा उद्देश आहे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी मी सतत प्रयत्न करेल असंही रणवीरने यावेळी बोलताना सांगितले. ‘लोकांचे मनोरंजन करणे हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. म्हणून लोकांचे मनोरंजन करणे हेच काम मी योग्य पद्धतीने करु शकतो. मात्र त्याचवेळी मी जबाबदार नागरिक म्हणून माझी कर्तव्य योग्यपणे पार पाडतो याचा मला अभिमान आहे,’ असं रणवीरने सांगितले.

रणवीरआधी दिग्दर्शक करण जोहरनेही मोदींबरोबरच्या भेटीमधील गप्पांबद्दलची माहिती सोशल नेटवर्किंगवरुन दिली होती. ‘शक्तीशाली आणि योग्य वेळी केलेला संवाद परिणामकारक असतो. अशाप्रकारचा संवाद वरचेवर होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणे खरोखरच सुंदर अनुभव होता,’ अशा कॅप्शनसहीत करणने या भेटीनंतर सर्व कलाकारांनी मोदींबरोबर काढलेला फोटो पोस्ट केला होता. या भेटीमध्ये सिनेक्षेत्राचे देशाच्या प्रगतीमध्ये कशाप्रकारे योगदान राहिले आहे तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून चांगला समाज घडवण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात सिनेश्रेत्रातील तरुण कलाकार आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.