25 November 2017

News Flash

पाहा, रणवीर म्हणतोय ‘माय नेम इज लखन’

...अन् समारंभात रणवीरने सर्वांचंच लक्ष वेधलं.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 5:38 PM

रणवीर सिंग

जिथे जाईल तिथे उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग. कोणताही पुरस्कार सोहळा असो, कार्यक्रम असो किंवा लग्नाची पार्टी त्याच्या उपस्थितीमुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते. नुकताच त्याने लंडनमध्ये एका उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नसमारंभात हजेरी लावली आणि नेहमीप्रमाणे आपल्या ‘बेफिक्रे’ अंदाजाने त्याने सर्वांचंच लक्ष वेधलं.

दिग्दर्शक करण जोहरसोबत रणवीरने संगीत समारंभाचं सूत्रसंचालनदेखील केलं. ‘तम्मा तम्मा’, ‘ततड ततड’ आणि ‘डीजेवाले बाबू’ या गाण्यांवर थिरकत त्याने पाहुण्यांचं मनोरंजन केलं. पण समारंभात जेव्हा तो अनिल कपूर यांच्यासोबत ‘माय नेम इज लखन’ या गाण्यावर थिरकला तेव्हा प्रेक्षकांमधून होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि प्रतिसाद पाहता त्याचा आतापर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणायला हरकत नाही. करण जोहर, रणवीर सिंग, अनिल कपूरसोबतच सोनम कपूर आणि हृतिक रोशनसुद्धा या लग्नसमारंभाला उपस्थित होते. इन्स्टाग्रामवर रणवीरच्या फॅन क्लबने हे व्हिडिओ पोस्ट करताच क्षणार्धात ते व्हायरल झाले. सोशल मीडियावर या व्हि़डिओला भरभरुन लाइक्सही मिळत आहेत.

Ranveer Singh and Anil Kapoor dancing to "my name is lakhan" at #KissMuss wedding last night , in London

A post shared by Ranveer's Best FC (@ranveer_best_fc) on

वाचा : …म्हणून अक्षय कुमार यंदाच्या वर्षी ठरला भाग्यवान

रणवीरच्या करिअरविषयी बोलायचे झाल्यास तो सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. यामध्ये तो अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार आहे. रणवीरसोबतच दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांचीही भूमिका असलेला हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on September 12, 2017 1:01 am

Web Title: ranveer singh set the stage on fire with his epic performance on my name is lakhan