22 November 2019

News Flash

…अन् दीपिकाने रणवीरला बॅटने बदडले

रणवीरचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे

दीपिका रणवीर

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपील देव यांची भूमिका साकाराणार आहे. तसेच चित्रपटात कपील देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याची सर्वत्र चर्चा होती. आता रणवीरने रोमी यांच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार हे एका मजेशीरपणे, जिफ फाइलद्वारे सांगितले आहे.

रणवीरने त्याच्या ट्विटर खात्यावर एक जिफ फाइल शेअर केली आहे. या फाईलमध्ये दीपिका रणवीरला मजेशीर अंदाजात बॅटने मरताना दिसत आहे. त्या दोघांचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. दरम्यान दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. ‘माझी जीवन कथा! रिल आणि रिअल’ असे ट्विटमध्ये लिहिले आहे. रणवीरचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच हा चित्रपट १० एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

First Published on June 12, 2019 11:33 am

Web Title: ranveer singh share gif file of character who is playing role of romi dev in 83 avb 95
Just Now!
X