News Flash

रणवीर सिंग -महेश बाबू पहिल्यांदाच एकत्र, फोटो शेअर करत रणवीर म्हणाला…

एकाच चित्रपटात झळकणार का ही जोडी?

बॉलिवूडचा ‘गली बॉय’ अभिनेता रणवीर सिंगने अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली आहेत. रणवीर सिंग सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. त्यात रणवीरने एक नवा फोटो शेअर केला आहे. रणवीरचा हा फोटो  सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

रणवीरचा व्हायरल होत असलेला हा फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणवीरसोबत दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू  दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यानंतर ही जोडी एकाच चित्रपटात झळकणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, हा फोटो कोणत्याही चित्रपटातील नसून एका जाहिरातीमधील आहे. थम्स अपच्या जाहिरातीनिमित्त हे दोन दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत.

“महेश बाबू उत्तम व्यक्ती आहे. त्यामुळे तुझ्या बरोबर काम करायला मिळणं हे माझे भाग्य आहे. तुझ्यासोबत संवाद साधणे हा या कामाच्या एक चांगला अनुभव आहे.” अशा आशयाचं कॅप्शन रणवीरने फोटो शेअर करत दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दरम्यान, २०१० साली ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात रणवीरसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळेच रणवीर सुपरस्टार झाला असं म्हटलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 6:48 pm

Web Title: ranveer singh shared a pic with south star mahesh babu went viral dcp 98
Next Stories
1 ‘कुछ बातों का जवाब सिर्फ…’; अंकिता लोखंडेने शेअर केला खास व्हिडीओ
2 लॉकडाउनच्या काळातही बॉलिवूडला नफा; सैफमुळे झाली ४०० कोटींची कमाई
3 जातीय व्यवस्थेवर अवधूत गुप्ते व्यक्त; पाहा, त्याचं नवं रॅप साँग
Just Now!
X