12 November 2019

News Flash

रणवीर सिंगनं शेअर केली कोहली, सचिनसोबतची क्षणचित्रं

रणवीरने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत भावनिक मेसेजही लिहिला आहे

सचिन तेंडूलकर, विराट कोहली, रणवीर सिंग

विश्वचषकातील रविवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे साऱ्यांचंच लक्ष वेधलं होतं. या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.रविवारी सकाळपासूनच सामन्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा मागे नव्हते. अभिनेता रणवीर सिंगनेदेखील मँचेस्टरच्या मैदानावर हजेरी लावत क्रीडाविश्वातील काही खेळाडूंची भेट घेतली. या भेटीनंतर त्याने इन्स्टाग्रामवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

मँचेस्टरच्या मैदानात हजेरी लावलेल्या रणवीरने सचिन तेंडूलकर, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, सौरव गांगुली, के.एल. राहुल,शिखर धवन आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंची भेट घेत त्यांच्यासोबत काही फोटो काढले. हे फोटो रणवीरने सोशल मीडियावर शेअर केले असून त्यासोबत एक भावनिक मेसेजही लिहिला आहे. ‘लहानपणापासूनच मी भारतीय क्रिकेटचा मोठा चाहता आहे. माझं माझ्या टीमवर मनापासून प्रेम आहे’, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे हे फोटो पोस्ट करत त्याने प्रत्येक खेळाडूविषयी कौतुकाचे उद्गार काढले आहेत.

“विराट कोहलीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला आहे. तो प्रचंड ध्येयवेडा व्यक्ती आहे. त्यामुळेच तो मैदानात कायम उत्तमरित्या कामगिरी करतो. देशाचं उत्तम प्रतिनिधीत्व करणारा खरा योद्धा. हा नवा भारत आहे आणि हा व्यक्ती नव्या भारताचा खरा हिरो. आम्हाला साऱ्यांना तुझ्याचा अभिमान आहे”, असं कॅप्शन देत रणवीरने विराटसोबत एक फोटो शेअर केला आहे.

रणवीरने विराटप्रमाणेच सचिनसोबतचाही फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याने फक्त ‘मास्टर ब्लास्टर’ असं म्हणत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर रणवीरने सौरव गांगुलीला ‘कोलकाताचा प्रिन्स’ म्हटलं आहे. त्याप्रमाणेच सेहवागला एक ‘उत्तम फलंदाज’ म्हणतं त्याचं कौतुक केलं आहे. यासोबतच अनेक क्रिकेटपटूंसोबत फोटो शेअर करत त्याने अशाच खास अंदाजात या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

MASTER BLASTER !!!@sachintendulkar

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 दरम्यान,रणवीरचा आगामी चित्रपटसुद्धा क्रिकेटशी निगडीत आहे. ’83’ या चित्रपटात तो कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या विजयगाथेवर हा चित्रपट आहे. ‘83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे.

First Published on June 18, 2019 2:07 pm

Web Title: ranveer singh shares priceless photos with virat kohli and sachin tendulkar ssj 93