News Flash

Video :रणवीरने शेअर केली ‘सिम्बा’च्या पडद्यामागील दृश्य

दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि तो अनेक वेळा सेटवर धम्माल करताना दिसतात.

रणवीर सिंग

रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातून सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा खान झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं असून अभिनेता रणवीर सिंगने सेटवरील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे.

रणवीर सिंग ज्याप्रमाणे चाहत्यांचा लाडका आहे त्याप्रमाणेच तो सेटवरही प्रत्येकाचा लाडका अभिनेता ठरत आहे. रणवीरचं सेटवरील प्रत्येक व्यक्तीबरोबर चांगली मैत्री झाली असून दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि तो अनेक वेळा सेटवर धम्माल करताना दिसतात. त्यामुळे अनेक वेळा हे दोघंही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, यावेळी रणवीरने सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.

‘सिम्बा’ या चित्रपटामध्ये रणवीर एका पोलिसाच्या भूमिकेत झळकला आहे. चित्रपटातील एका सीनचं चित्रीकरण सुरु असताना रणवीरने सेटवर सुरु असलेल्या पडद्यामागच्या दृश्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर काही गुंडासोबत मारामारी करत असून रोहित शेट्टी चित्रपटातील साहसदृश्य कॅमेरामध्ये पाहत आहे.

दरम्यान, शेअर झालेल्या या व्हिडिओवरुन चित्रपटाची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत करताना दिसत आहे. हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 5:09 pm

Web Title: ranveer singh shares simmba behind the scene footage
Next Stories
1 बिग बींच्या नातीचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत का ?
2 एकेदिवशी निशाला लातूरला घेऊन जाणारच, सनीच्या पतीनं व्यक्त केली इच्छा
3 ‘गोल्ड’मुळे अक्षयच्या लोकप्रियतेत तुफान वाढ, असं केलं चाहत्यांनी प्रेम व्यक्त
Just Now!
X