News Flash

टोरंटोमध्ये दिपीकासह रणवीर सेलिब्रेट करणार व्हॅलेंटाइन डे!

दीपिकाला सरप्राइज देण्यासाठी गुरुवारी सकाळी कॅनडाला रवाना झाला.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

दीपिका आणि रणवीरमधले प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. हे तथाकथित प्रेमीयुगुल अनेक कार्यक्रमांमध्ये आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकत्रच दिसते. आता काही दिवसांवरच व्हॅलेंटाइन डे आला आहे. मग हे प्रेमीयुगुल तरी कसे मागे राहिल.
सध्या दीपिका ही ‘xXx’ या हॉलीवूड चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी टोरंटोला गेली आहे. मग काय तिच्या मागोमाग आता रणवीरही तिथे पोहचलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या कामास सुरुवात करण्यापूर्वी रणवीरकडे काही रिकामी वेळ आहे. त्यामुळे त्याला हा वेळ एकट्याने घालवण्याची इच्छा नाही म्हणून तो दीपिकाला सरप्राइज देण्यासाठी गुरुवारी सकाळी कॅनडाला रवाना झाला. टोरंटोला पोहचल्यावर रणवीरने एका चाहतीसोबत काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्यात आलेला आहे.
रणवीरला टोरंटोमध्ये पाहून दीपिकाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2016 12:06 pm

Web Title: ranveer singh to celebrate valentines day with rumoured girlfriend deepika padukone in toronto
Next Stories
1 पाहाः साय-फाय ‘फुंतरु’ चित्रपटाचा ट्रेलर
2 मुक्काम पोस्ट ‘चॅनेल’
3 आयला..सचिन!!!
Just Now!
X