16 February 2019

News Flash

IPLमध्ये १५ मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी रणवीर सिंग घेतो तब्बल एवढे कोटी!

सोहळ्यात रणवीर सिंग परफॉर्म करणार हे आयोजन समितीने आधीच निश्चित केले होते

रणवीर सिंग

७ एप्रिलपासून आयपीएलच्या ११ व्या पर्वाला सुरूवात होणार आहे. ओपनिंग सेरेमनीमध्ये रणवीरचा मुख्य परफॉर्मन्स असणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का १५ मिनिटांच्या या परफॉर्मन्ससाठी तो तब्बल ५ कोटी रुपये घेणार आहे. हिंदुस्थान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आयपीएलच्या अनावरण सोहळ्यात रणवीर सिंग परफॉर्म करणार हे आयोजन समितीने आधीच निश्चित केले होते. त्यासाठी ते कितीही रक्कम द्यायला तयार झाले.

रणवीर त्याच्या जबरदस्त परफॉर्मन्स आणि अभिनयातून तिकडे उपस्थितांचे मनं जिंकेल यात काही शंका नाही. त्याच्यातला सळसळता उत्साह पाहूनच आयोजन समितीला तो हवा होता हे नक्की. रणवीरच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो एका रॅपची भूमिका साकारणार आहे. आलिया भट्टचीही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहे. पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

गली बॉयशिवाय तो रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ सिनेमातही दिसेल. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अली खान असणार आहे. या सिनेमात आर. माधवनची महत्त्वपूर्ण भूमिका होती. पण काही कारणांमुळे आर. माधवन आता या प्रोजेक्टमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आता कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागणार हे पाहणं उत्सुकतेचे असेल यात काही शंका नाही.

First Published on March 26, 2018 5:34 pm

Web Title: ranveer singh to get 5 crore amount for his 15 minute performance in ipl