28 September 2020

News Flash

दिपीकाला दिलेले वचन रणवीर पूर्ण करणार

खांद्याच्या शस्त्रक्रीयेनंतर डॉक्टरांनी दिलेला आरामाचा सल्ला तसेच बाजीराव मस्तानी, दिल धडकने दो आणि आय़फा पुरस्कार सोहळ्याच्या समालोचनाची तयारी यात व्यस्त असलेला रणवीर सिंग..

| June 3, 2015 06:59 am

खांद्याच्या शस्त्रक्रीयेनंतर डॉक्टरांनी दिलेला आरामाचा सल्ला तसेच बाजीराव मस्तानी, दिल धडकने दो आणि आय़फा पुरस्कार सोहळ्याच्या समालोचनाची तयारी यात व्यस्त असलेला रणवीर सिंग प्रकाश पदुकोण यांचा साठावा वाढदिवस साजरा करण्यासाठी बंगरुळमध्ये उपस्थित राहून दिपीकाला दिलेले वचन पूर्ण करणार आहे.
५ जुन रोजी दिपीकाचे वडिल आणि माजी बॅडमिंटन पटू प्रकाश पदुकोण यांचा ६० वा वाढदिवस आहे. हा दिवस दीपिका आणि रणवीरने धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरवले होते. परंतू आयफा सोहळ्याची सुरुवात देखील याच दरम्यान होत आहे. त्यामुळे या सोहळ्यातील रणवीरच्या सहभाहाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. असे असले तरी रणवीर बंगरुळमध्ये उपस्थित राहणार असून दीपिकाला दिलेले वचन पूर्ण करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबई मिररमध्ये प्रसारीत झालेल्या वृत्तानूसार याबाबतची कल्पना रणवीरने आयोजकांना दिली असल्याचे समोर आले आहे. पदुकोण कुटूंबियांबरोबर दिवस घालवल्यानंतर ६ जून रोजी रणवीर मलेशियामध्ये परतणार आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2015 6:59 am

Web Title: ranveer singh will keep his promise to deepika padukone
Next Stories
1 २०१६ मध्ये प्रदर्शित होणार ‘रॉक ऑन २’
2 फसवणूकप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेत्रीसह सहाजणांना अटक
3 ‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ ही उद्ध्वस्त माणसांची गोष्ट’
Just Now!
X