देशात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीदेखील ते संकट पूर्णपणे टळलेलं नाही. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्येच आता अभिनेता रणवीर शौरी करोनाची लागण झाली आहे. रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
“मला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. माझ्यात सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी क्वारंटाइन झालो आहे”, अशी पोस्ट रणवीरने शेअर केली आहे.
I have tested positive for #COVID19. Symptoms are mild. Am quarantining.
— Ranvir Shorey (@RanvirShorey) February 17, 2021
रणवीर शौरी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून अनेकदा ते समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतात. अलिकडेच तो ‘लूटकेस’ आणि ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात झळकला होता.
‘या’ सेलिब्रिटींनाही झाली होती करोनाची लागण
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय- बच्चन, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन, कनिका कपूर, मोहिना कुमारी, पूरब कोहली, जोआ मोरानी, किरण कुमार, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, वरुण धवन,रकुलप्रीत सिंह, क्रिती सेनॉन,नीतू कपूर.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 10:07 am