प्रसिद्ध अमेरिकी गायक, संगीतकार किंग वॉन याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तो २६ वर्षांचा होता. अटलांटामधील एका नाईट क्लब बाहेर दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात काही गोळ्या किंग वॉनला लागल्या. अन् जागीच त्याचा मृत्यू झाला. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

अवश्य पाहा – ये फिटनेस की बात है! पाहा मलायकाचा ‘हॉट योगा’

अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीचे वातावरण आहे. देशात सर्वत्र निवडणूकीवर चर्चा सुरु आहे. असेच काहीसे मतभेद शुक्रवारी रात्री अटलांटामधील नाईट क्लबमध्ये झाले. पुढे या मतभेदांचं रुपातर भांडणात झालं. या भांडणात दोन गटांनी एकमेकांवर गोळीबारही केला. दरम्यान काही गोळ्या तेथे उपस्थित असलेल्या किंगला लागल्या. अन् जागीच त्याचा मृत्यू झाला.

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

अमेरिकेतील काही वृत्तवाहिन्यांनी किंग वॉनच्या मृत्यूसाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. हे भांडण सुरु झालं तेव्हा तिथे काही पोलीस देखील उपस्थित होते. परंतु त्यांनी या भांडणाला रोखलं नाही. परिणामी संगीतकाराचा मृत्यू झाला. असा आरोप केला जात आहे. पोलीस प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. गोळीबार करणाऱ्या पाच लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.