प्रसिद्ध पॉप सिंगर पॉप स्मोक याची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशानं २० पॉप स्मोकच्या घरात शिरला आणि त्याने पॉपची गोळ्या घालून हत्या केली.

२० वर्षीय ‘पॉप स्मोक’ अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप सिंगर आहे. लॉस एंजेलिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पॉप संध्याकाळी साडेचार वाजता रेडिओवरील शो संपवून घरी आला होता. घरी येताच तो आराम करण्यासाठी आपल्या खोलीत गेला. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती त्याच्या खोलीत चोरी करत होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना त्या चोराने पॉपवर गोळ्या झाडल्या. परिणामी राहत्या घरीच त्याचा मृत्यू झाला. पॉपचा मृत्यू झाला त्यावेळी त्याचे कुटुंबीय घरातच होते. परंतु पॉपच्या खोलीतील भिंती ध्वनीप्रतिरोधक असल्यामुळे त्याच्या ओरडण्याचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पॉपची आई त्याला नाश्ता करण्यासाठी बोलवण्यास गेली. त्यावेळी पॉप मृतावस्थेत आढळून आला. आरोपीनं तोंडावर मास्क घातला होता. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा चेहरा दिसू शकला नाही. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

कोण होता ‘पॉप स्मोक’?

पॉपचं खरं नाव बशर बराक जॅक्सन असं आहे. परंतु संगीताच्या जगात त्याला लोक पॉप स्मोक म्हणून ओळखत होते. किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनला आदर्श मानणारा पॉप वयाच्या १६व्या वर्षी ‘मीट द वू’ हे गाणे गाऊन पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर गेल्या चार वर्षात त्याने वेलकम टू द पार्टी, शेक द रुम, मीट द वू, पार्टी अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. येत्या काळात पॉप संगीत क्षेत्रातील नवा सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे लोक पाहात होते.