12 July 2020

News Flash

रश्मी देसाईसाठी ‘या’ अभिनेत्याला खावा लागला मार!

तो लोकप्रिय अभिनेता आहे

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १३’चं पर्व नुकतंच संपलं. यंदाच्या पर्वामध्ये रश्मी देसाई, आसिम रियाज, सिद्धार्थ शुक्ला या स्पर्धकांची विशेष चर्चा रंगली. हा शो संपला असला तरीदेखील या तिघांच्या चर्चा मात्र थांबत नाहीयेत. अलिकडेच रश्मीने एका मुलाखतीत या शोविषयी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी बोलत असताना एका अभिनेत्याने तिच्यासाठी मार खाल्याचंही सांगितलं.

‘उतरन’ या मालिकेतून खऱ्या अर्थाने नावारुपाला आलेल्या रश्मीने नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बिग बॉसच्या घरातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. तसंच तिच्या एका मित्राने आणि बिग बॉसच्या घरातील स्पर्धकाने तिच्यासाठी मार खाल्ल्याचं स्पष्ट केलं. ‘बिग बॉस’च्या घरात असताना रश्मीची जवळपास सगळ्यांशीच चांगली मैत्री होती. मात्र आसिम रियाज हा तिचा सर्वात चांगला आणि जवळचा मित्र असल्याचं साऱ्यांनीच पाहिलं. विशेष म्हणजे आसिमने रश्मीसाठी चक्क मारही खाल्याचं समोर आलं आहे.

“आसिम रियाज हा माझ्या सगळ्यात चांगला मित्र आहे. आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. त्यामुळे एकमेकांविषयीच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला माहित असतात. त्याने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. प्रत्येक वेळी माझी मदत केली आहे. बिग बॉसच्या घरात जसजशी परिस्थिती बदलत गेली तसतशी आमच्यातली मैत्री अधिक दृढ झाली. तसंच कठीण प्रसंगात माझी साथ दिल्यामुळे आसिमचे मी मनापासून आभार मानते”, असं रश्मी म्हणाली.
पुढे ती म्हणते, “बिग बॉसच्या घरात आसिम कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. तसंच अनेकांचा रोषही पत्करला. इतकंच नाही तर त्याने माझ्यासाठी मारही खाल्ला. परंतु त्याने माझ्यासाठी जे काही केलं ते कधीही मला जाणवू दिलं नाही”.

वाचा : मृणाल कुलकर्णीच्या लेकाचं कलाविश्वात पदार्पण; ‘या’ मालिकेत साकारतोय मुख्य भूमिका

दरम्यान, रश्मी देसाई ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रश्मीने केवळ मालिकाच नाही तर काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिची पर्सनल लाइफची चर्चेचा विषय ठरत असते. बिग बॉसच्या घरामध्ये रश्मी आणि सिद्धार्थ शुक्लाचं भांडण सर्वाधिक चर्चेत आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 9:48 am

Web Title: rashmi desai calls asim riaz her genuine friend reveals shocking facts bigg boss 13 ssj 93
Next Stories
1 मृणाल कुलकर्णीच्या लेकाचं कलाविश्वात पदार्पण; ‘या’ मालिकेत साकारतोय मुख्य भूमिका
2 Movie Review : पुरुषच नाही तर महिलांच्याही मानसिकतेला चपराक लगावणारा ‘थप्पड’
3 ‘भाईजान’ धावला कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी; ‘हे’ गाव घेतलं दत्तक
Just Now!
X