24 October 2020

News Flash

अश्लील कॉमेंट करणाऱ्या ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली; करणार कायदेशीर कारवाई

त्या फोटोमुळे अभिनेत्रीवर केल्या गेल्या अश्लील कॉमेंट

चंदेरी दुनियेतील अनेक कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतात. परंतु आपल्या ऑनलाईन पोस्टमुळे अनेकदा कलाकारांवर ट्रोल होण्याची वेळ देखील येते. असाच काहीसा प्रकार टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईसोबत घडला आहे. एका फोटोमुळे रश्मीला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अश्लील कॉमेंट करणाऱ्या या ट्रोलर्सविरोधात रश्मी आता कायदेशीर कारवाई करणार आहे.

रस्त्यावरील चहावाला ते सुपरमॉडेल; एका फोटोमुळे रातोरात सुपरस्टार झालेले ‘सात’ कलाकार

 

View this post on Instagram

 

The question isn’t who is going to let me; it’s who is going to stop me#Unstoppable #RashamiDesai #NowTrending #WomanPower

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on

या १० अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारली नागिन; तुमची फेव्हरेट कोण?

रश्मी देसाईने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यांनी काही आक्षेपार्ह आणि अश्लील कॉमेंट करत रश्मीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या ट्रोलर्सविरोधात रश्मीने संताप व्यक्त केला आहे.

“घरातील महिलांबाबत तुम्ही असेच विचार करता का? असे संस्कार पालकांनीच तुमच्यावर केले आहेत का? सोशल मीडियावर लिहिण्यापूर्वी आपण नेमकं काय लिहितोय याचा एकदा विचार करावा. कारण अशा प्रकारचे विचार फक्त अशिक्षित लोकच करु शकतात.”, अशा आशयाची कॉमेंट करुन रश्मीने कायदेशीर कारवाई करण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. तिची ही कॉमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 2:49 pm

Web Title: rashmi desai complaint against cyber bullying mppg 94
Next Stories
1 ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
2 फार्महाऊसवर स्टारने सुशांतचे करिअर संपवायची दिली होती धमकी, दिग्दर्शकाचा खुलासा
3 अभिनेत्रीने सुनील ग्रोवरसोबत काम करण्यास दिला नकार; निर्मात्यांवर केला फसवणूकीचा आरोप
Just Now!
X