करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मी गौतम हिला करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच तिच्यावर उपचार सुरु आहेत.

अवश्य पाहा – ‘बेजबाबदार सिद्धार्थमुळे एलिमिनेट झाले’; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्री संतापली

‘एक्स्ट्रा जबरदस्त’ या टीव्ही शोच्या चित्रीकरणादरम्यान रश्मीला करोनाची लागण झाली. त्यामुळे या शोमधील सर्व कलाकारांच्या करोना टेस्ट घेण्यात आल्या आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे रश्मी सोडून कोणाचाही टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही. तरी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सर्व मंडळींना पुढील १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान सर्व कलाकार क्वारंटाईनमध्ये असल्यामुळे ‘एक्स्ट्रा जबरदस्त’ या शोचं चित्रीकरण आणखी काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.

अवश्य पाहा – “हृतिकने अंघोळ करुच नये”; कियाराने व्यक्त केली अनोखी इच्छा

महाराष्ट्रात १३ लाख ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ७ हजा ४२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाख ९२ हजार ३०८ इतकी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८६.५ टक्के इतका झाला. मागील २४ तासांमध्ये ८ हजार १५१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २१३ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ९ हजार ५१६ इतकी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.