News Flash

रश्मिका मंदानाच्या मानधनात वाढ; बिग बींसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी

रश्मिकाच्या मानधनात वाढ

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर रश्मिकाचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, रश्मिकाने तिच्या मानधनात वाढ केली असून बिग बींसोबत काम करण्यासाठी ती चांगलं मोठं मानधन घेतल्याचं पिंकव्हिलाच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रश्मिकाचा ‘मिशन मजनू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर रश्मिकाने विकास बहल यांचा डेडली हा आगामी चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी रश्मिकाला मिळणार आहे. मात्र, या चित्रपटासाठी रश्मिकाने चक्क कोटींच्या घरात मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा : एका वर्षात कपिल शर्मा भरतो कोटयवधींचा टॅक्स; आकडा वाचून व्हाल थक्क

सध्या तरी विकास बहल यांच्या ‘डेडली’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या चित्रपटासाठी रश्मिकाने तब्बल ५- ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. रश्मिका पूर्वी हा चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफला ऑफर करण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव कतरिनाने या चित्रपटाला नकार दिला. त्यामुळे आता रश्मिकाला बिग बींसोबत झळकण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रश्मिकाचं मानधन वाढल्यामुळे सध्या कलाविश्वात ही एकच चर्चा रंगली आहे. ‘डेडली’ या चित्रपटात रश्मिका व बिग बींसोबत नीना गुप्तादेखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंटअंतर्गत होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 3:22 pm

Web Title: rashmika mandanna charges a big amount for bollywood movie ssj 93
Next Stories
1 …म्हणून दीपिकाने डिलीट केल्या सोशल मीडियावरील पोस्ट
2 Video : याची देही,याची डोळा… ; पाहा सई लोकूरचा लग्नसोहळा
3 ‘नव्या वर्षाचं स्वागत कसं करु?’ ; इरफानच्या पत्नीची भावूक पोस्ट
Just Now!
X