28 September 2020

News Flash

‘चांगल्या भूमिका लिहिल्या जाणं हा अनुभव दुर्मीळच’

‘लूटके स’ या चित्रपटात पहिल्यांदाच रसिका विनोदी भूमिके तून प्रेक्षकांसमोर येते आहे.

गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉम्र्सचा विस्तार झाला आणि त्या लाटेत अनेक चांगल्या नवोदित कलाकारांचे चेहरे वेब मालिकांच्या माध्यमातून परिचयाचे झाले. एरव्ही या कलाकारांना व्यावसायिक चित्रपटांतून प्रत्येक वेळी चांगल्या भूमिका मिळवणे अवघड झाले असते, मात्र वेब मालिकांनी हे अंतर दूर केले. आणि देशभरातील अनेक गुणवान कलाकारांना इंडस्ट्रीत एक चेहरा मिळाला. ‘मिर्झापूर’, ‘मेड इन हेवन’, ‘दिल्ली क्राइम’सारख्या वेबमालिकांमधून एक चांगली अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेली रसिका दुगल हा या इंडस्ट्रीला मिळालेला आणखी एक नवा चेहरा. ‘डिस्ने-हॉटस्टार’वरील ‘लूटके स’ या चित्रपटातून रसिका पहिल्यांदाच अभिनेत्री म्हणून मुख्य भूमिके तून लोकांसमोर आली आहे. या चित्रपटानिमित्ताने पहिल्यांदाच विनोदी भूमिका करण्याची संधी मिळालेली रसिका स्त्रियांसाठी अजूनही चांगल्या भूमिका लिहिल्या जाणं हा अनुभव दुर्मीळच असल्याचं सांगते.

‘लूटके स’ या चित्रपटात पहिल्यांदाच रसिका विनोदी भूमिके तून प्रेक्षकांसमोर येते आहे. याआधी तिने के लेल्या सगळ्या वेब मालिका या गंभीर आशयाच्या होत्या, पण कलाकार म्हणून गंभीरच भूमिका करायच्या किं वा विनोदी भूमिकाच करायच्या असं काही ठरवता येत नाही. तुम्हाला कोणती भूमिका मिळते आहे, याचा विचार जास्त महत्त्वाचा असतो. माझ्या सुदैवाने मला खूप वेगवेगळ्या शैली आणि आशयाच्या वेब मालिका करायला मिळाल्या. त्यामुळे गंभीर भूमिका करणारी अभिनेत्री अशी एक प्रतिमा निर्माण झालेली असू शकते. ‘लूटके स’ हा मला स्वत:ला एका वेगळ्या आशयात आजमावून पाहण्याची संधी देणारा चित्रपट ठरला, असं रसिका सांगते. आपल्याकडे मुळात स्त्रियांसाठी चांगल्या भूमिका लिहिल्या जाणं अवघड आहे. त्यातूनही स्त्री पात्राला समोर ठेवून चांगली विनोदी भूमिका लिहिणं ही तर फारच दूरची गोष्ट आहे. स्त्रियांवरून विनोद करण्यातच आपल्याकडे धन्यता मानली जाते. आणि अशा विनोदी भूमिका करण्यात मला अजिबात रस नाही. त्याउलट, स्त्रिया उत्तम विनोद करू शकतात, हा आपला अनुभव असल्याचे ती सांगते. अनेक स्टॅण्डअप कॉमेडी शो करणाऱ्या कलाकार आहेत ज्या उत्तम, दर्जेदार विनोदी कार्यक्रम लोकांसमोर सादर करतात, मात्र दुर्दैवाने त्यांची फारशी दखल घेतली जात नसल्याचे तिने सांगितले. राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘लूटके स’ चित्रपटाच्या निमित्ताने एक चांगली विनोदी भूमिका करता आलीच, त्याचबरोबरीने कु णाल खेमूसारख्या विनोदी अभिनयात सरस असलेल्या कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दलही तिने आनंद व्यक्त के ला.

‘एफटीआयआय’मधून अभिनयाचे धडे घेतलेली जमशेदपूरची ही तरुण अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर नाव कमावण्यासाठी धडपड करते आहे. सध्या इंडस्ट्रीत बाहेरून आलेल्या कलाकारांना जो संघर्ष करावा लागतो, त्याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मी स्वत: एफटीआयआयमधून शिक्षण घेऊन मुंबईत काम करण्यासाठी आले तेव्हा मलाही कु ठे जायचं आहे, कोणाला भेटायचं, ऑडिशन कशी द्यायची याबद्दल कु ठलीच कल्पना नव्हती. मी आणि माझ्याबरोबरचे इतर मित्रमैत्रिणी आम्ही एकत्र काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होतो. सुरुवातीची काही वर्ष फार मनासारखं कामही मिळालं नाही, मात्र कदाचित आम्ही सगळे एकत्र होतो. आणि जो संघर्ष मी अनुभवत होते, तोच त्यांनाही करावा लागत होता हे दिसत असल्याने प्रयत्न करत राहण्याचं बळ मिळत गेल्याचं ती सांगते. सुरुवातीच्या काळात मिळालेल्या छोटय़ा भूमिकाही खूप काही शिकवून गेल्या असं रसिका सांगते. ‘किस्सा’ या चित्रपटात मी काम के लं होतं. अनुप सिंग दिग्दर्शित या चित्रपटात माझी खूपच छोटी भूमिका होती, मात्र यात इरफान खान, तिलोत्तमा शोम, टिस्का चोप्रासारख्या कसलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांचं काम जवळून पाहता आलं आणि शिकताही आलं. असे अनेक छोटे-छोटे अनुभव नंतरच्या काळात खूप मोलाचे ठरले, असं ती सांगते.

हिंदी चित्रपटांमध्ये अजूनही चांगल्या भूमिका मिळवणं सोपं नाही. त्या तुलनेत ओटीटी प्लॅटफॉम्र्समुळे मर्यादित संधी आणि सर्जनशील कलाकारांची वाढती संख्या ही जी कोंडी झाली होती ती फु टली, असं रसिका म्हणते. ओटीटी प्लॅटफॉम्र्स आणि वेब मालिका किं व वेब चित्रपट या के वळ कलाकारांसाठी नाही तर अनेक दिग्दर्शक-लेखक यांच्यासाठीही सकारात्मक बाब ठरली आहे. अनेकांकडे चांगली गोष्ट असते, मात्र प्रत्येकाकडे चित्रपट बनवण्यासाठी तेवढे बजेट असेलच असे नाही. अनेकदा बजेट नसल्याने चांगली कथा-कलाकार असूनही चित्रपटनिर्मिती थांबून राहते, चित्रपट बनले तरी ते प्रदर्शित होत नाहीत. या सगळ्या गोष्टींवर मात करत आपला चित्रपट, मालिका लोकांसमोर आणणे शक्य झाले असल्याचे ती स्पष्ट करते. आपला चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित व्हावा, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. लोकांकडून चित्रपटगृहातून मिळणारा प्रतिसाद हा वेगळाच अनुभव असतो, मात्र आत्ताच्या परिस्थितीत चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटीचे माध्यम खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरत असल्याचे मत तिने व्यक्त के ले. ‘डिस्ने हॉटस्टार’ किं वा ‘नेटफ्लिक्स’सारख्या ओटीटींचा विस्तार जगभरात असल्याने तुम्हाला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद खूप मोठा असतो. मी याआधी ‘डिस्ने हॉटस्टार’वर ‘आऊट ऑफ लव्ह’ ही वेब मालिका के ली होती. या मालिकेसाठी मला जगभरातून प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. आता ‘लूटके स’ हा चित्रपटही हॉटस्टारवरच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे जगभरातील लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल यात शंका नसल्याचे तिने सांगितले.

कलाकार आपल्या पद्धतीने त्यांच्या वाटय़ाला आलेल्या भूमिकांमध्ये रंग भरत असतात. मात्र त्यासाठी सशक्त कथा आणि भूमिका लिहिल्या गेल्या पाहिजेत. आत्तापर्यंत केलेल्या वेब मालिकांचा आशयच दर्जेदार असल्याने त्या भूमिकांनाही यश मिळाले. आपल्याकडे अनेकदा साचेबद्ध पद्धतीच्या कथा-आशयावर भर दिला जातो. मूळ लिखाणातच जर बदल झाले तर कलाकारांनाही आव्हानात्मक भूमिका करण्याची संधी मिळेल आणि प्रेक्षकांना अधिकाधिक चांगला आशय देता येईल. रसिका दुगल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 1:19 am

Web Title: rasika dugal another new face of the bollywood industry zws 70
Next Stories
1 करोना काळातील प्रेमपट
2 ‘ फुलराणी’ रुपेरी पडद्यावर
3 ‘झी टॉकीज’वर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा
Just Now!
X