18 January 2021

News Flash

शनायाचा हॉट बिकिनी लूक पाहिलात का?

सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असते. या मालिकेतील शनाया, गुरुनाथ सुभेदार आणि राधिका सुभेदार हे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. या मालिकेतील रसिका सुनिलने शनायाची भूमिका साकारली होती. पण काही कारणास्तव तिला ही मालिका सोडावी लागली. आता शनायाची भूमिका ईशा केसकर साकरतेय.

रसिका सुनिल ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत सध्या नसली तरी ती सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांशी गप्पा मारताना दिसते. नुकताच रसिकाने तिचा बिकिनी लूकमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केला आहे. या लूकमध्ये रसिका अतिशय हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे. तर काहींना तिचा हा लूक फारसा आवडला नसल्याचे दिसत आहे.

रसिकाने बिकिनीमधील हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत छान असे कॅप्शन देखील दिले आहे. काही दिवसांपूर्वी रसिकाचा ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता ती चित्रपटात दिसणार की मालिकेमध्ये हे पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 7:29 pm

Web Title: rasika sunil hot and bold bikini photo avb 95
Next Stories
1 देशाला लुटण्याची हीच योग्य वेळ; बॉलिवूड दिग्दर्शकाचा उद्योजकांना उपरोधिक टोला
2 ‘स्वामिनी’मध्ये नीना कुळकर्णी साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
3 ‘बोनस’मध्ये पाहायला मिळणार गश्मीर महाजनी-पूजा सावंतची केमिस्ट्री
Just Now!
X