News Flash

रसिकाच्या बोल्ड फोटोंवर अमेय वाघची अतरंगी कॉमेंट

रसिका सुनीलच्या मादक अदा

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली रसिका सुनील छोट्या पडद्यावरील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. रसिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

 

View this post on Instagram

 

@lets_draw_light @mua_tejaswini25 @hairbyniralisoni

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

अलिकडेच तिने स्वत:चे काही आकर्षक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यातील एका फोटोवर अभिनेता अमेय वाघने अतरंगी कॉमेंट केली आहे. तो म्हणाला, “आमच्या कास्टिंग काऊच मधला काऊच कशाला चोरला?”

अमेय वाघ आणि निपूण धर्माधिकारी हे दोघे मिळून कास्टिंग काऊच नावाचा एक कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम यूट्यूबवर प्रदर्शित होतो. या कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखती घेतल्या जातात. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमेयने रसिकाच्या या फोटोवर अशी गंमतीदार प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

The moment before I smile @lets_draw_light @mua_tejaswini25 @hairbyniralisoni

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

अमेयने केलेली ही कॉमेंट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी रसिकाची खिल्ली उडवली तर काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 4:00 pm

Web Title: rasika sunil hot photo amey wagh mppg 94
Next Stories
1 ‘थप्पड’ मारणाऱ्या पतीविरोधात महिला करणार तक्रार
2 अमिताभ यांनी ‘ब्रम्हास्त्र’च्या दिग्दर्शकाला दिलं आव्हान
3 सुबोध भावेचा ‘विजेता’ लवकरच पडद्यावर; पोस्टर रिलीज
Just Now!
X