News Flash

सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीच्या आईने घेतला धसका; मुंबईला परत येण्यास दिला नकार

अभिनेत्री रतन राजपूतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता अभिनेत्री रतन राजपूतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना धक्का बसल्याचे सांगितले आहे. तसेच तिच्या आईने तिला मुंबईला पुन्हा जाण्यास नकार दिल्याचे सांगितले आहे.

‘माझ्या आईची विचारशैली आता पूर्णपणे बदलली आहे. तू खूप घाबरली आहे. इंडस्ट्रीमध्ये जे काही सुरु आहे त्यामुळे सर्वांचेच कुटुंबीय घाबरले आहेत. ज्यांची मुले इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांचे पालक असे विचार करतात की जर त्यांच्यासोबत काही चुकीचे झाले तर त्यांची मुले देखील असे पाऊल उचलतील. माझी आई मला सारखं विचारते सगळं ठिक आहे ना’ असे रतनने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

कुछ हादसे एक प्रकार का अविश्वास पैदा कर जाते हैं। खुद तो जैसे तैसे सम्भल जाता है इंसान …पर अब परिवार का विश्वास कैसे जीता जाये? वो दुखी होकर कहते हैं… तुम लोग असल ज़िंदगी में भी Acting करते हो क्या? कुछ महीन और महत्वपूर्ण सवाल उठ खड़े हुए हैं! अपना और अपने परिवार का ख्याल रखें please #ithinkofmyfamily

A post shared by Ratan Raajputh (@ratanraajputh) on

पुढे ती म्हणाली, ‘माझ्या घरातले हा विचार करुन डिप्रेस होत आहेत की मी तर डिप्रेस झाले नाही ना?. माझी आई मला मुंबईला परत जाण्यासाठी परवानगी देत नाही. मी सतत तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 1:53 pm

Web Title: ratan rajput disturbed sushant singh rajput suicide says my mom not allowing to go mumbai avb 95
Next Stories
1 अंकितासोबतच्या ब्रेकअपचा सुशांतला होत होता पश्चाताप, डॉक्टरांचा खुलासा
2 दिव्यांग चाहत्याने पायाने काढले बिग बींचे चित्र
3 अमेरिकेचं ठरलं १५ जुलैला थिएटरचं पुनःश्च हरीओम… भारतात कधी?
Just Now!
X