चित्रपटसृष्ट्रीतील पुरुषप्रधान मानसिकता आणि महिलांना वासनेचं साधन असल्यासारखी दिली जाणारी वागणूक याविरोधात अभिनेत्री रत्ना पाठक शहाने आवाज उठवला आहे. याविषयी बोलताना त्यांनी सोनाक्षी सिन्हावर सडकून टीका केली आहे.

”दबंग’सारख्या चित्रपटात भूमिका साकारण्यास नकार द्यायला पाहिजे. कारण या चित्रपटात महिलांना केवळ वासनेचं साधन असल्यासारखे दाखवले गेले. चित्रपटात अभिनय करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने अशा भूमिका करण्यास स्पष्ट नकार दिला पाहिजे,’ असे त्यांनी म्हटले. विशेषकरून जेव्हा तुमच्यावर कोणी अवलंबून नसेल तेव्हा तरी तुम्ही ठाम भूमिका का नाही घेऊ शकत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

वाचा : SRKने अंबानीच्या मुलाला त्याच्या पहिल्या पगाराबद्दल विचारले आणि..

यावेळी अभिनेत्री सिल्क स्मिताचे उदाहरण देत त्या पुढे म्हणाल्या की, ‘तिचे कुटुंबीय तिच्यावर अवलंबून होते, म्हणून ती भूमिकांना नकार देऊ शकत नव्हती. माझे कुटुंबीय माझ्यावर अवलंबून नाहीत, त्यामुळे मी अशा भूमिकांना स्पष्ट नकार देऊ शकते.’ रत्ना पाठक यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवत ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ फेम अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही यावर तिचं मत व्यक्त केलं. ‘लोकांवर, समाजावर आपला इतका जास्त प्रभाव पडतो, की भूमिकांची निवड करताना आपण सजग राहणं गरजेचंच आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीची/ महिलेची चित्रपटात खिल्ली उडवताना दाखवता, तेव्हा ग्रामीण भागातील दहा मुलं त्याचे अनुकरण करतात आणि तसे करण्यात काहीच गैर नाही अशी त्यांची समजूत होऊन जाते,’ असं भूमी म्हणाली.

VIDEO : ‘विरुष्का’च्या रिसेप्शनमध्ये शाहरुखचा भांगडा

‘दबंग ३’ चित्रपटातही सोनाक्षी भूमिका साकारणार आहे, त्यामुळे रत्ना पाठक यांनी केलेल्या विधानावर ती काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.