News Flash

‘रात्रीस खेळ चाले ३’चे होर्डिंग फक्त रात्रीच दिसतात, पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ...

गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका ‘रात्रीस खेळ चाले ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण मालिका प्रदर्शित होण्यापूर्वी ‘अण्णा नाईक’ परत येणार, याचीच सर्वत्र चर्चा रंगली होती. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत अण्णा नाईकांची क्रेझ आहे. ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. आता ‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये काय असणार याचीच उत्सुकता सर्वांनाच आहे.

दरम्यान रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या प्रोमोशनसाठी एक नवीन युक्ती वापरली गेली. एक असं होर्डिंग बनवलं गेलं की ते फक्त आणि फक्त रात्रीच दिसेल. जशी काही भूत रात्रीच दिसतात तसेच या होर्डिंगवरचे अण्णा नाईक रात्रीच दिसतात. सध्या या होर्डिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

पाहा: ‘रात्रीस खेळ चाले ३’मधील अभिरामची पत्नी आहे तरी कोण?

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये प्रॉपर्टीसाठी घरात सुरु असलेले राजकारण, खून प्रकरण हे सर्व काही दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये २० वर्षांपूर्वीची कहाणी दाखवण्यात आली होती. या भागातील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. पण मालिकेच्या शेवटी शेवंता आणि अण्णा यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता ‘रात्रीस खेळ चाले ३’ बाबत चाहत्यांमध्ये उत्सुक पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 6:43 pm

Web Title: ratris khel chale 3 new hoarding avb 95
Next Stories
1 “देश संकटात असताना फालतू गोष्टी पोस्ट करत बसणार नाही!” म्हणत ‘या’ अभिनेत्याने सोशल मीडियापासून घेतली विश्रांती
2 ‘या’ कारणामुळे रिम्मी सेन बॉलिवूडपासून दुरावली!, “सलमान मदत करेल पण…”
3 धक्कादायक: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या पत्नीने मुलीसह केली आत्महत्या
Just Now!
X