“इसारलंय”, “त्या माका काय माहित?”, हे डायलॉग सगळ्यांच्या ओठांवर रुळले आहेत. ज्याच्यामुळे हे डायलॉग लोकप्रिय झाले आहेत, त्या रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेतील पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुडतरकर. प्रल्हाद सोशल डिस्टन्सिंग आर्वजून पाळतोय आणि त्याबद्दल सगळ्यांना आवाहन देखील करतोय.
लेखक अभिनेता प्रल्हाद कुडतरकर म्हणाला, “कोरोना या विषाणूने अख्ख्या जगाला ग्रासलं आहे. संपूर्ण जग या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय. लोक भाजी किंवा अन्नधान्य आणण्यासाठी अनेक ठिकाणी अजूनही गर्दी करतात आहेत आणि गर्दीतच कोरोना आघात करतोय. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की सरकारने आपल्यावर नियम लादले नाही आहेत. पण आपण एक सुजाण नागरिक म्हणून त्या नियमांची अंमलबजावणी करूया. गर्दी टाळून घरात राहूया. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर अनेक मेसेजेसच्या रूपात बऱ्याच अफवा पसरतात, त्या अफवांकडे सगळ्यांनी दुर्लक्ष करून मननीय मुख्यमंत्री ज्या सूचना देतात त्या सूचनांचं पालन करूया. हा लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनावर मात करूया.”
आणखी वाचा : ‘थोडं तरी डोक्याचा वापर करा’; सचिन पिळगावकर संतापले
दरम्यान, राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून आता तो ३२० वर पोहोचला आहे. मंगळवारी राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३०२ एवढी होती. परंतु बुधवारी तो आकडा वाढून ३२० वर पोहोचला. यामध्ये मुंबईत १६ आणि पुण्यात २ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2020 3:44 pm