देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटोने प्रत्येकाच्या मनात धडकी भरवली आहे. दरोरोज वाढणारी रुग्णसंख्या. त्यात वाढणारे मृत्यांचे आकडे हे सारं काही मन हेलावून टाकणारं आहे. दरोदर येणाऱ्या निधनाच्या बातम्यांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. करोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जीवाभावाचं कुणीना कुणीतरी गमावलं आहे. अशात लोकांनी संयम बाळगणं आणि काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात अनेक मराठी कलाकारही पुढे येऊन नागरिकांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेंवता म्हणून घराघरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने देखील एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना कळकळीची विनंती केली आहे. अपूर्वा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर अपूर्वा कायम वेगवेगळे फोटो शेअर करत असते. मात्र नुकताच तिने चाहत्यांना धीर देणारा एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने भगवद् गीतेत कृष्णाने पांडवाना दिलेल्या एका उपदेशाची आठवण करून दिलीय.

इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करत अपूर्वा म्हणाली, ” आणि आपण पुन्हा एकदा थांबलो. पण हे थांबणं गरजेचं आहे. कारण अनेक कुटुंबांमध्ये वाईट प्रसंग घडले आहेत. त्या सगळ्या परिवारांना इश्वर शक्ती आणि बळ देवो. सध्याच्या परिस्थितीमुळे लोकं घाबरत आहेत. पण घाबरू नका कारण आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे. ” असं म्हणत अपूर्वाने चाहत्यांना संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

हा क्षण जपा.

पुढे ती म्हणाली, ” श्री कृष्णीने भगवद् गीतेत सांगितलंय, कमजोर तुम्ही नाही तुमची वेळ आहे. तुमचं जीनव हे तुमच्या भविष्यात नाही आणि भूतकाळातही  नाही ते या क्षणात आहे. तर हा क्षण जपा. तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या, उगीचच घराबाहेर पडू नका.” असं म्हणत अपूर्वाने चाहत्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलाय.

वाचा: “इतरांप्रमाणेच करोनामुळे माझ्यावरही आर्थिक संकट”, ‘CID’च्या इन्स्पेक्टर अभिजीतचा खुलासा

या व्हिडीओला तिने ‘हे ही दिवस जातील …. सरी सुखाच्या येतील ‘ असं कॅप्शन दिलं आहे. अपूर्वाच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिलीय.