News Flash

‘रात्रीस खेळ चाले’; “नाईक परिवाराखडसून तुमका सगळ्यांका…”

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील माईंनी दिल्या शुभेच्छा

यंदाच्या गुढी पाडव्याच्या सणावर देखील करोनाचं सावट पसरल्याचं दिसतंय. करोनाची रुग्ण संख्या वाढल्याने राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वांना गुढी पाडव्याचा सण हा चार भिंतींच्या आतच साजरा करावा लागणार आहे. कुटुंबासोबत सुरक्षित रित्या हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनाकडू करण्यात येतंय.

असं असलं तरी काही मालिकांमधून प्रेक्षकांना गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळणार आहे. तर मालिकेतून तुमचं दररोज मनोरंजन करणाऱ्या कलाकारांनीदेखील गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील माईंनी त्यांच्या खास कोकणी अंदाजात चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Loksatta (@loksattalive)

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील माईंनी “तुमका सगळ्यांका नाईक परिवाराखडसून गुढी पाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा.” असं म्हणत येणार नवं मराठी वर्ष सर्वांना आनंदाचं सुखा समाधानाचं जावो अशी प्रार्थना केली आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत सध्या चांगलाच ड्रामा रंगताना दिसतोय. आता मालिकेचं कथानक प्रेक्षकांमध्ये आतूरता निर्माण करणार आहे. आता सगळ्याना प्रतिक्षा आहे ती म्हणजे अण्णा आणि शेवता येण्याची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 4:57 pm

Web Title: ratris khel chale mai wish new year gudhi padwa from set kpw 89
Next Stories
1 हा गुढीपाडवा साजरा करा ‘गुढीपाडवा फिल्म फेस्टिवल’ सोबत
2 ‘हा’ अभिनेता होणार अमिताभ बच्चन यांचा मुलगा; सोशल मीडियावरुन दिली माहिती
3 सई-आदित्य जाणार हनिमूनला, ‘माझा होशील ना’ मनाली विशेष भाग
Just Now!
X