News Flash

शेवंता येतेय भेटीला; पुन्हा एकदा पाहायला मिळणार थरार

आजपासून ‘रात्रीस खेळ चाले-3’ प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ रहस्य आणि थरारक कथानकाने या मालिकेने प्रेक्षकांना कायमच खिळवून ठेवलं. हाच थरार आता प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. 22 मार्च म्हणजेच आजपासून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा तीसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या मालिकाच्या प्रोमोतूम अण्णा नाईक भूताच्या रुपात मालिकेत झळकतील याचा अंदाज प्रेक्षकांना आलाच आहे. या भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यांची आवडती शेवंता दिसणार आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक सुंदर फोटो शेअर आहे. यात तिने ” पुन्हा एकदा भेटूया …रात्री अकरा वाजता..रात्रीस खेळ चाले ३” असं कॅप्शन दिलंय. अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोत ती पिवळ्या साडीत नटून थटून नाईकांच्या वाड्यासमोर उभी असल्याचं दिसतंय. तिच्या फोटोला अनेक चाहत्यांनी लाईक केलं असून शेवतांला भेटण्यासाठी आतुर असल्याचं म्हंटलं आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘रात्रीस खेळ चाले २’ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते.या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, अण्णा नाईक या भूमिकेने तर सगळ्यांच्या मनात एक भीती निर्माण केली होती. तर मालिकेच्या दुसऱ्या भागातील अण्णा नाईक आणि शेवतांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. आता या दोन्ही भागांतील पात्र ‘रात्रीस खेळ चाले ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 12:12 pm

Web Title: ratris khel chale part 3 marathi actress apurva nemlekar as shevant cooming soon kpw 89
Next Stories
1 नामवंत ओडिसी नृत्यांगणा लक्ष्मीप्रिया महापात्रा कालवश
2 रसिका सुनीलची नवी झेप; व्हिडीओ पाहून चाहते थक्क
3 कभी कभी, सिलसिला या चित्रपटांचे कथाकार सागर सरहदी काळाच्या पडद्याआड
Just Now!
X